शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘मनीएज’द्वारे ३०० कोटींची फसवणूक? मुख्य सूत्रधार राजीव जाधवचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 03:14 IST

जाधवने हरिप्रसादला हाताशी घेत मनीएज ग्रुपची स्थापना करत विविध ठिकाणी शाखा उघडणे सुरू केले. 

मुंबई : मनीएज घोटाळ्याची पाळेमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात पसरली असून, फसवणुकीचा आकडा ३०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आर्थिक गुन्हे शाखेने वर्तविली आहे. यामागील मुख्य सूत्रधार राजीव जाधवचा शोध सुरू आहे. जाधवने गुंतवणुकीच्या रकमेतून मालमत्ता उभारण्यासह रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.

एमबीए झालेला राजीव जाधव पूर्वी शेअर मार्केटमध्ये इंडिया इन्फोलीन नावाने गुंतवणुकीचे काम करायचा. पुढे एका बँकेच्या म्युचुअल फंडमध्ये नोकरीला लागला. तेथे आरोपी हरिप्रसाद वेणुगोपाल नोकरीला होता.  पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूकदारांसाठी ये-जा सुरू असताना पोस्टात काम करणारी प्रिया प्रभू (५३) त्यांच्या संपर्कात आली. जाधवने हरिप्रसादला हाताशी घेत मनीएज ग्रुपची स्थापना करत विविध ठिकाणी शाखा उघडणे सुरू केले. 

रिअल इस्टेटसह पतसंस्थेत उलाढाल...मेकॅनिकल इंजिनिअर असलेला रावराणे याच्या ‘आरंभ’ नावावे सुरू असलेल्या रिअल इस्टेट व्यवसायात जाधवने गुंतवणूक केली. तसेच विविध मालमत्ताही खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी रावराणेलाही अटक केली असून, त्याच्या व्यवसायात आतापर्यंत किती पैसे गुंतवले? याचा लेखाजोखा तपासला जात आहे.  

दोघांविरुद्ध लूक आउट नोटीस जारी राजीव आणि प्रिया देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या विरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे. तपास पथकाने आरोपींच्या घरांसह त्यांच्या मुलुंडच्या कार्यालयात छापेमारी करत महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केले आहे. आतापर्यंत आरोपींसह त्यांच्या कंपनीचे १६ बँक खाती गोठविण्यात आली असल्याचे तपास पथकाने सांगितले. मुलुंडचे कार्यालय सहा महिन्यांपासून बंद होते. कार्यालयातून मालमत्तेसंबंधित कागदपत्रे हाती लागले असून, त्याचा तपास सुरू आहे.

नवीन गुंतवणूकदार जोडणाऱ्याला कमिशनमुंबई, नागपूर, नाशिकसह राज्यभरात जाधवने १२ शाखा सुरू केल्या.  २०१३ पासून त्याने गुंतवणुकीवर वर्षाला २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखले. सुरुवातीला दरमहिना गुंतवणुकीवर २ टक्केप्रमाणे पैसे देत होता. तसेच नवीन गुंतवणूकदार जोडणाऱ्यालाही कमिशन मिळत असल्याने ही साखळी वाढत गेली. त्यामुळे फसवणुकीचा आकडा ३०० कोटींवर जाण्याची शक्यता गुन्हे शाखेने वर्तविली. तसेच हरिप्रसाद हा सेल विभाग सांभाळत असून, आर्थिक व्यवहार जाधव हाताळत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी