शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मेहनतीची कमाई भामट्यांच्या खिशात; दामदुपटीच्या आमिषांचा नागरिकांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 13:27 IST

लुटली जाणारी रक्कम लाख ते कोटींच्या घरात

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: फसव्या आमिषांना बळी पडून नागरिक कोट्यवधी रुपये गमावत आहेत. त्यामध्ये दामदुपटच्या परताव्याची हमी देणाऱ्या कार्यालयांसह सोशल मीडियावरील आमिषांचा समावेश आहे. परंतु, गुन्हा घडूनही अनेकांना आपण फसलो आहोत याची जाणीव होत नसल्याने पोलिसांकडे तक्रार करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. 

 

मसाला आणि सुक्या मेव्याच्या नफ्यातून गुंतवणूकदारांना अधिक नफा दिला देण्याचे आमिष दाखवून ३०० जणांच्या फसवणुकीची घटना नुकतीच समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एसपीव्हीएस कंपनीच्या प्रमुखांवर देखील अशा प्रकरणातून गुन्हा दाखल झाला आहे, तर गतवर्षी उरण परिसरात दामदुप्पटच्या माध्यमातून कोट्यवधींचा अपहार करणारे सतीश गावंड व सुप्रिया पाटील काही महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतरही अनेकांकडून अशा फसव्या स्कीम चालवून नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे झटपट श्रीमंतीच्या प्रयत्नात असलेले सर्वसामान्यांपासून ते गर्भश्रीमंत त्यांच्या गळाला लागत आहेत. शुक्रवारी एपीएमसीत गुन्हा दाखल झालेल्या रुद्रा ट्रेडर्सचा प्रमुख नितीन प्रकाश पार्टे हा देखील एसपीव्हीएस कंपनीशी संबंधित आहे. 

‘ती’ कार्यालये एकमेकांशी जोडली

कंपनीतून बाहेर निघाल्यानंतर त्याने स्वतःची कंपनी काढून गुंतवणूक घेण्यास सुरुवात केली होती. तर एपीएमसी आवारात इतरही अशा कंपन्या चालत असून त्यांचाही अपहार काही दिवसात उघड होण्याची शक्यता आहे. तर अशी कार्यालये एकमेकांशी जोडल्याचेही दिसून येत आहे.

लुटली जाणारी रक्कम लाख ते कोटींच्या घरात

  • दामदुप्पट सोबतच ट्रेडिंगच्या बहाण्याने किंवा इतर कारणांनी ऑनलाईन गुंतवणूक करून घेणाऱ्यांचे जाळे देखील सोशल मीडियावर पसरलेले आहे. त्यामध्ये फसल्या जाणाऱ्यांचे प्रमाण कमी असले तरीही त्यांची लुटली जाणारी रक्कम लाख ते कोटींच्या घरात असते.

  • नुकतेच एका व्यक्तीला ट्रेडिंगच्या बहाण्याने सव्वा कोटीचा गंडा घातल्याचीही घटना समोर आली आहे. ऑनलाईन फसवणूक झालेल्या व्यक्ती पोलिसांकडे तक्रारीसाठी धाव घेतात, मात्र दामदुप्पटच्या आमिषाला बळी पडून गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती फसवणूक होऊनही पोलिस ठाण्याची पायरी चढत नाहीत. 

  • अशा प्रकरणांना आळा कसा घालायचा, याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी