शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण थांबविल्याने ३ बहिणींनी सोडलं घर; गुडगावमधून मुलींना घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 07:49 IST

तळोजातून एकाच वेळी पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाल्याने पोलिसांनी गांभीर्याने घेतले होते

नवी मुंबई : शिक्षणाची आवड असूनही घरचे शिकू देत नसल्याने तीन अल्पवयीन बहिणींनी व शेजारी राहणाऱ्या दोन मुलींना शिकण्यात रस नसल्याने घर सोडले. या पाचही मुलींना गुन्हे शाखेने गुंडगाव येथून सुखरूपणे नवी मुंबईत आणले. या मुलींना महिला व बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सुरू असल्याचे तपासी पथकाने सांगितले. 

तळोजातून एकाच वेळी पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाल्याने पोलिसांनी गांभीर्याने घेतले होते. त्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहायक निरीक्षक नीलम पवार, यांच्यासह पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या मुली वांद्रे येथे गेल्याचे दिसून आले. रेल्वे प्रवाशांच्या यादी तपासली असता त्या गुडगावला असल्याचे समजले. 

७ महिन्यांपासून त्यांची सुरू हाेती तयारी

यातील जुहू (१४, बदललेले नाव) हिला सात बहिणी असल्याने घरच्यांनी त्यांचे शिक्षण थांबवले होते. परंतु, त्यांना शिक्षणाची आवड असल्याने एक महिन्यापासून तमन्नाने सात व पाच वर्षाच्या बहिणीसोबत पळून जायची तयारी चालवली होती. त्यातच शेजारी राहणाऱ्या रिया (१६ बदललेले नाव) व प्रियंका (१४) यांना शिक्षणाची आवड नसल्याने व घरचे वातावरण चांगले नसल्याने त्यादेखील त्यांच्यासोबत पळून जायला तयार झाल्या होत्या. त्यानुसार ३ फेब्रुवारीला पाचही मुलींनी घर सोडून थेट गुडगाव गाठले होते.

टॅग्स :Policeपोलिस