शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लाखाच्या बदल्यात ३ लाख; नोटा छापणारी टोळी जेरबंद, १ कोटी १४ लाखांच्या बनावट नोटाही जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 09:20 IST

Fake Notes: रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी भांडणाऱ्या टोळीकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे  एक कोटी  १४ लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांच्या टोळीला ताब्यात घेतले.

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी भांडणाऱ्या टोळीकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे  एक कोटी  १४ लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांच्या टोळीला ताब्यात घेतले. हा प्रकार बुधवारी रात्री घडला. 

औंढा नागनाथ येथील पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे हे बुधवारी रात्री शहरात पेट्रोलिंग करत होते. एक गाडी ग्रामीण रुग्णालयाजवळ दिसली. यावेळी १ महिला व सहा जण आपसात वाद करीत होते. संशय आल्यामुळे पोलिसांनी त्यांची व गाडीची तपासणी केली. तपासणीवेळी त्यांच्याजवळ ३९ लाख रुपये आढळले. परंतु  एका महिलेने १२.५० लाख रुपये देऊन मला ३९ लाख रुपयांच्या बनावट नोटा देऊन गाडीने पसार झाल्याचे पोलिस निरीक्षक झुंजारे  यांना सांगितले. 

गाडीचा पाठलाग... - झुंजारे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गाडीचा पाठलाग करून मोबाइल ट्रॅकद्वारे खामगाव येथून ३ आरोपींना ताब्यात घेतले. - त्यांच्याकडूनही ७५ लाख रुपये बनावट नोटा जप्त केल्या. अशा १ कोटी ४० लाख रुपयांच्या बनावट नोटांसह ९ आरोपीस औंढा पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्व आरोपी हे लातूर, औरंगाबाद, नांदेड, खामगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती गुरुवारी सकाळी दहा वाजता प्राप्त झाली. - या प्रकरणात हैदराबाद, मध्य प्रदेश (इंदोर) येथील आरोपींचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी