शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यात २८ वा गुन्हा दाखल : एसीबीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 21:36 IST

गोसेखुर्द घोटाळ्यात बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ८.५५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देकालव्याच्या कामात ८.५५ कोटींचा गोलमाल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द घोटाळ्यात बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ८.५५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सिंचन विभागातील पाच अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे. गोसेखुर्द घोटाळ्यातील हा २८ वा गुन्हा आहे.गोसेखुर्द घोटाळ्यातील आरोपीत तत्कालीन कार्यकारी अभियंता केशव चंद्रकांत तायडे, तत्कालीन अधीक्षक अभियंता संजय लक्ष्मण खोलापूरकर, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सोपान रामराव सूर्यवंशी, तत्कालीन कार्यकारी अधिकारी रोहिदास मारुती लांडगे आणि वरिष्ठ लेखा अधिकारी धनराज आत्माराम नंदागवळी यांचा समावेश आहे. नुकताच दाखल झालेला गुन्हा गोसेखुर्द डाव्या कालव्याच्या ६ ते ३० किलोमीटरच्या अस्तरीकरणाच्या कामाशी निगडित आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियेत गोंधळ होऊन त्यात जलसंपदा विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांची भूमिका असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाचा एसीबीची नागपूर शाखा तपास करीत होती. तपासात आरोपींनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून अवैधरीत्या निविदा कामांचे दर ८.५५ कोटीने वाढविल्याचा खुलासा झाला. या कामात वित्त व नियोजन मुंबईचे प्रधान सचिवांची मंजुरी घेणे आवश्यक होते. तरीसुद्धा विदर्भ सिंचन विभागाचे कार्यकारी संचालकांनी आपल्यास्तरावर या निविदेला मंजुरी दिली. एसीबीने या कामाची तपासणी केली असता त्यांना आरोपी अधिकाºयांचे लागेबांधे असल्याची माहिती समजली. त्याआधारे एसीबीने बुधवारी आरोपींविरुद्ध सदर ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. गोसेखुर्द घोटाळ्यात आतापर्यंत २८ गुन्हे दाखल झाले आहेत. यात २०० कोटींच्या फसवणुकीची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात अधिकारी आणि कंत्राटदारांसह ३० जणांना आरोपी बनविण्यात आले आहे. यात अनेक अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. काही अधिकाºयांचा मृत्यूही झाल्याची माहिती आहे. या घोटाळ्यामुळे काही दिवसांपूर्वी राजकीय वातावरणही तापले होते. यात आणखी एक गुन्हा दाखल झाल्यामुळे गोसेखुर्द घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे. ही कारवाई अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मिलिंद तोतरे, मनोज कारनकर, गजानन गाडगे, विकास गडेलवार यांनी केली.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पCorruptionभ्रष्टाचार