शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी महिलेला २५ हजार दंड; कारण काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 07:39 IST

२०१७ मध्ये पीडित महिलेने आरोपी संदीप पाटीलने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्या संमतीशिवाय गर्भपात करण्यास भाग पाडले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बलात्कार करून दोनदा गर्भपात करण्यासाठी भाग पाडण्याचा आरोप केल्यानंतर स्वतःच एफआयआर सहमतीने रद्द करण्यास तयार झालेल्या तक्रारकर्त्या महिलेला उच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले. न्यायालयाने या प्रकरणी  महिलेला २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

२०१७ मध्ये पीडित महिलेने आरोपी संदीप पाटीलने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्या संमतीशिवाय गर्भपात करण्यास भाग पाडले. पहिल्या लग्नाशी संबंधित घटस्फोटाचा अर्ज न्यायप्रविष्ट असतानाच पीडितेची पाटीलशी ओळख झाली होती. पाटीलने लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती गरोदर राहिल्यानंतर त्याच्या घरच्यांनी एकदा कोल्हापुरात तर दुसऱ्यांदा कर्नाटकात अशी दोनदा गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा दावाही पीडितेने केला होता.  

या प्रकरणी न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, दाखल एफआयआरमधील सर्व आरोपांमध्ये तथ्य असले तरीही दोघांमधील शारीरिक संबंध सहमतीने होते. तक्रारकर्त्या महिलेनेही ते प्रतिज्ञापत्रात मान्य केले आहे. त्यामुळे दाखल एफआयआर रद्द करणेच योग्य ठरेल, असे खंडपीठाने आदेशात नमूद केले. तसेच महिलेला २ आठवड्यात २५ हजार रुपये टाटा मेमोरियल रुग्णालयात भरण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Courtन्यायालय