शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सोने-चांदीच्या दुकानातून दिवसाढवळ्या २३.६० लाखांचा ऐवज लंपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:15 IST

मालेगाव (वाशिम) : शहरातील दुर्गा चौकस्थित एका सोने-चांदीच्या दुकानातून दिवसाढवळया २३ लाख २२ हजाराचे सोने आणि ४० हजार रुपये रोख रक्कम ठेवून असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली.

ठळक मुद्देशहरातील दुर्गा चौकात प्रविण वर्मा यांचे दुर्गा ज्वेलर्स या नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे.यावेळी दुकानाबाहेर उभा राहून एक अज्ञात व्यक्ती पाळत ठेवून होता. अज्ञात चोरट्याने वर्मा यांची ७७५ ग्रॅम सोने (किंमत २३ लाख २२ हजार) आणि ४० हजार रुपये रोख ठेवलेली बॅग पळविली.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : शहरातील दुर्गा चौकस्थित एका सोने-चांदीच्या दुकानातून दिवसाढवळया २३ लाख २२ हजाराचे सोने आणि ४० हजार रुपये रोख रक्कम ठेवून असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवार, ७ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, मंगरूळपिरमध्ये ५ ते ६ जुलैच्या रात्री सोने-चांदीच्या दोन दुकानांमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनेचा तपास अद्याप लागला नसताना मालेगावातही धाडसी चोरी झाल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे सिद्ध होत असून पोलिसांच्या कार्यकर्तुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मालेगावातील चोरी प्रकरणासंबंधी प्राप्त माहितीनुसार, शहरातील दुर्गा चौकात प्रविण वर्मा यांचे दुर्गा ज्वेलर्स या नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. वर्मा यांनी नेहमीप्रमाणे ७ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता दुकान उघडले व त्यांनी साफसफाई झाल्यानंतर पुजापाठ सुरू केला. यावेळी दुकानाबाहेर उभा राहून एक अज्ञात व्यक्ती पाळत ठेवून होता. त्याने वर्मा यांना ‘आपकी चप्पल कोई उठाके ले गया’, असे म्हटले. त्यामुळे वर्मा हे चप्पलचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले असता, संधीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने वर्मा यांची ७७५ ग्रॅम सोने (किंमत २३ लाख २२ हजार) आणि ४० हजार रुपये रोख ठेवलेली बॅग पळविली. यापक्ररणी प्रविण वर्मा यांनी मालेगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांकडून दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले. तसेच श्वानपथक व फिंगर प्रिंट तज्ज्ञांचीही याकामी मदत घेतली जात असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक योगेश धोत्रे यांनी दिली.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrimeगुन्हा