शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! अंधेरीत २३ वर्षीय एअर होस्टेसवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 18:37 IST

स्वप्नील अरुणकुमार बडोनिया (२३) आरोपीला अटक केली आहे.

ठळक मुद्देद्यकिय अहवालानंतर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे का ? ते उघड होईल असे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.रुणीच्या कंपनीत सिक्युरिटी अधिकारी म्हणून काम करणाऱ्या स्वप्नील अरुणकुमार बडोनिया (२३) आरोपीला अटक केली आहे.

मुंबई - अंधेरीतील एका नामांकित एअरलाइन्स कंपनीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना एमआयडीसी परिसरात घडली आहे. या प्रकऱणी एमआयडीसी पोलिसांनी तरुणीच्या कंपनीत सिक्युरिटी अधिकारी म्हणून काम करणाऱ्या स्वप्नील अरुणकुमार बडोनिया (२३) आरोपीला अटक केली आहे. प्राथमिक तपासात स्वप्निलचाच या गुन्ह्यात सहभाग निश्चित झाला असून इतर दोन आरोपींची चौकशी सुरू आहे. मात्र, वैद्यकिय अहवालानंतर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे का ? ते उघड होईल असे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.

हैदराबाद येथे कंपनीच्या कामानिमित्त गेलेली तरुणी सोमवारी मुंबईत दाखल झाली. त्यावेळी कंपनीच्या कारमधून तिला घरी सोडण्यासाठी सिक्युरिटी अधिकारी स्वप्नील बडोनिया हा आला होता. त्यावेळी तरुणीने मालाड येथील घरी सामान ठेवून स्वप्निलजवळ मद्यपान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार दोघांनी मालाडच्या एका बारमध्ये मद्यपान केले. दोघेही नशेत होते. ते चालण्याच्याही शुद्धीत नव्हते. घरी अशा अवस्थेत गेल्यास घरातले ओरडतील. त्यामुळे दोघेही एका हॉटेलमध्ये थांबले. मात्र, त्या ठिकाणी त्यांना रुम देण्यास मॅनेजरने नकार दिला. अखेर स्वप्नील हा तिला घेऊन त्याच्या अंधेरीतील शेरे-ए-पंजाब, कमलेश अपार्टमेंटमध्ये घेऊन आला. त्यावेळी खोलीत स्वप्निलचे दोन रुम मेट आणि इतर एक महिला हजर होती. मध्यरात्री स्वप्निलने नशेत असलेल्या तरुणीवर बलात्कार केला. मंगळवारी दारूची नशा उतरल्यानंतर तरुणीला वेदना असह्य झाल्या, त्यावेळी तिला तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे लक्षात आले.  घरी परतल्यानंतर तरुणीने घडलेला प्रकार तिच्या घरातल्यांना सांगितला. त्यानुसार घरातल्यांनी तिला उपचारासाठी परळच्या केईएम रुग्णालयात दाखल केले. तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवत स्वप्निलला अटक केली आहे. स्वप्निलच्या मित्रांचा सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही. लवकरच वैद्यकिय अहवालानंतर त्यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे की नाही ते उघड होईल. त्यानुसार पुढे पोलीस कारवाई करतील असे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसAndheriअंधेरी