शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सराफा व्यापाऱ्यास बंदुकीच्या धाकावर २२.५० लाखांनी लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 01:05 IST

दुचाकीने घरी परत जात असलेल्या सराफा व्यापाऱ्यास तिघांनी अडवून गन कानशिलावर ठेवत त्याच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला. त्या बॅगमध्ये ३ किलो चांदी, अर्धा किलो सोने व १.२५ लाख रुपये रोख असा एकूण २२.५०लाख रुपये किमतीचा मुद्देमाल होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (खापरखेडा ): दुचाकीने घरी परत जात असलेल्या सराफा व्यापाऱ्यास तिघांनी अडवून गन कानशिलावर ठेवत त्याच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला. त्या बॅगमध्ये ३ किलो चांदी, अर्धा किलो सोने व १.२५ लाख रुपये रोख असा एकूण २२.५०लाख रुपये किमतीचा मुद्देमाल होता. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणखैरी नांदा जुना रोडवर शुक्रवारी रात्री ८.४५ वाजता घडली.खुशाल खाडे, रा. जुना नांदा यांचे कोराडी येथे खाडे ज्वेलर्स नामक दुकान आहे. त्यांनी रात्री ८.३०वाजता दुकान बंद केले आणि दुचाकीने घरी जायला निघाले. लोनखैरी रोडवर मागून दुचाकीने आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. त्यातील एकाने त्यांच्या कानशिलावर गन ठेवली तर दुसयाने त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर तिघांनी नागपूरच्या दिशेने पळ काढला. त्या बॅगमध्ये १.२५ लाख रुपयांची तीन किलो चांदी, २० लाख रुपयांचे अर्धा किलो सोने व १.२५ लाख रुपये रोख अस एकूण २२.५० लाख रुपयांचा मुद्देमाल होता, अशी माहिती खुशाल खाडे यांनी खापरखेडा पोलिसांना दिली. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी