शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे लाचखोरांची खुर्ची सुटेना, राज्यभरात २२३ लाचखोर कर्तव्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 07:16 IST

bribe News : लाचखोरीच्या कारवाईत अडकलेल्यांंवर निलंबनाची कारवाई करण्यास मुहूर्त मिळत नसल्याची धक्कादायक माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

- मनीषा म्हात्रे मुंबई : राज्यभरात लाचखोरीविरुद्ध जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. भ्रष्टाचार व लाचखोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याबाबत राज्य सरकारकड़ून वेळोवेळी सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात लाचखोरीच्या कारवाईत अडकलेल्यांंवर निलंबनाची कारवाई करण्यास मुहूर्त मिळत नसल्याची धक्कादायक माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. राज्यभरातील २२३ लाचखोर अजूनही कर्तव्यावर हजर आहेत.लॉकडाऊनमुळे लाचखोरीला ब्रेक लागला. मात्र अनलॉकचा टप्पा सुरू होताच लाचखोरी जैसे थे स्वरूपात पाहावयास मिळत आहे. जानेवारी ते २७ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात ५४७ गुन्हे नोंद असून त्यात ५१३ सापळा कारवाई आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा २०१ ने कमी आहे. यात ७०३ आरोपी एसीबीच्या जाळ्यात अडकले असून एसीबीच्या  पुणे परिक्षेत्रात सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत. यापैकी अवघ्या १० प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.कोणाच्यातरी कृपाशीर्वादामुळे  हे लाचखोर वर्षानुवर्षे  खुर्चीला चिकटून आहेत. २०१३ पासून आतापर्यंत लाचखोरी प्रकरणी कारवाई होऊनही २२३ लाचखोरांचे निलंबन करण्यात आलेले नाही. यात, नांदेड परिक्षेत्रातील सर्वाधिक ५५ तर नागपूर परिक्षेत्रातील ५१ लाचखोरांचा समावेश आहे. त्यातही महसूल/नोंदणी/ भूमिअभिलेख (३०), ग्रामविकास (४८), शिक्षण-क्रीडा (४६), सहकार, पणन व वस्त्रोद्योग (१५) आणि पोलीस होमगार्ड आणि कारागृह विभागातील (१०) जणांचा समावेश आहे. तर अन्य विभागांतील प्रत्येकी १ ते ४ जणांचा समावेश आहे. 

जनजागृती सप्ताह२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान राज्यभरात लाचखोरीविरोधात दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. कोणी भ्रष्टाचार करताना आढळून आल्यास एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.  

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रCorruptionभ्रष्टाचार