शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Video - बापरे बाप! एअरपोर्टवर महिलेने बॅग उघडताच बाहेर आले तब्बल 22 साप, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 13:02 IST

चेन्नई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकार्‍यांनी मलेशियाहून आलेल्या महिलेची बॅग उघडली तेव्हा लोकांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे सांगितले जात आहे.

चेन्नई विमानतळावरचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर आता जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहून युजर्सही हैराण झाले आहेत. मलेशियाहून चेन्नई विमानतळावर पोहोचलेल्या एका महिला प्रवाशाचे सामान चेक-इन केले असता, सामानातून जे बाहेर आले ते पाहून कस्टम विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले. या घटनेच्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

चेन्नई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकार्‍यांनी मलेशियाहून आलेल्या महिलेची बॅग उघडली तेव्हा लोकांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे सांगितले जात आहे. बॅग उघडताच महिलेच्या पिशवीतून एकामागून एक 22 प्रकारचे साप बाहेर पडले आणि जमिनीवर सरकू लागले. हे साप वेगवेगळ्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये पॅक करून आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

सर्व साप वेगवेगळ्या प्रजातीचे असल्याचे सांगितले जात आहे. 28 एप्रिल रोजी ही महिला फ्लाइट क्रमांक एके 13 ने मलेशियाची राजधानी क्वालालंपूरहून चेन्नई विमानतळावर पोहोचली, त्यानंतर काय झाले ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. व्हिडिओमध्ये अधिकारी काठीच्या मदतीने सापांना बाहेर काढताना दिसत आहेत. 

कस्टम अधिकाऱ्यांनी महिलेला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर तपासादरम्यान जे वास्तव समोर आले ते पाहून सगळेच अवाक् झाले. त्याचवेळी, सीमा शुल्क कायदा 1962 आणि वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत सामानाची तपासणी करताना महिलेच्या बॅगेत सापडलेले विविध प्रजातींचे 22 साप आणि एक सरडा जप्त करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsnakeसाप