शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

नागपुरात औषध व्यापाऱ्यास लावला २२ लाखाचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:22 IST

दोन कोटी रुपयांचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका औषध व्यापाऱ्यास २२.५० लाखाचा चुना लावण्यात आला. रुपये मिळताच ठगबाज आरोपी फरार झाला.

ठळक मुद्देकंत्राट मिळवून देण्याचे दाखविले आमिष : मानकापूरमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन कोटी रुपयांचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका औषध व्यापाऱ्यास २२.५० लाखाचा चुना लावण्यात आला. रुपये मिळताच ठगबाज आरोपी फरार झाला. मानकापूर पोलीस त्याचा शोध घेत आहे. महेंद्र मगन भालेराव (४३) रा. गुमथळा, कामठी असे आरोपीचे नाव आहे.सुमितनगर, झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी दिनेश सहारे औषध व्यापारी आहेत. त्यांची बराक फार्मासिटीकल कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून सहारे शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा करतात. एक वर्षापूर्वी आरोपी महेंद्र हा सहारे यांच्या कार्यालयात आला होता. थोड्याच दिवसात त्याच्याशी चांगली ओळख झाली. त्याने सहारे यांना आपली शासकीय अधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख असल्याचे सांगितले. शासकीय विभागांमध्ये औषध पुरवठा करण्यासाठी दोन कोटी रुपयाची निविदा निघाल्याचे त्याने सहारेला सांगितले. आपल्या ओळखीचा वापर करून औषध पुरवठ्याचे कंत्राट सहारेला मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्याने सांगितले की, निविदेच्या अटीनुसार त्याला १० टक्के रक्कम सुरक्षा रक्कम म्हणून जमा करावी लागेल. यासाठी सहारे तयार झाले. सहारेने जून २०१९ पासून भालेरावला रक्कम देण्यास सुरुवात केली. धनादेश व रोख रक्कम असे करीत सहारेने २२.५० लाख रुपये भालेरावला दिले. त्यानंतर तो निविदा मंजूर होत असल्याचे सांगत राहिला. अनेक दिवसपर्यंत तो टाळाटाळ करीत राहिला. सातत्याने टाळाटाळ करीत असल्याने सहारेला संशय आला. त्याने त्याच्यावर दबाव टाकला. आपले पैसे परत मागू लागला. परंतु भालेरावने रक्कम परत करण्यास नकार दिला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर सहारेने मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी