शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

२१ लाखांच्या फसवणूक प्रकरणी बिल्डरवर गुन्हा, डिसेंबर १७ ते ऑगस्ट २२ दरम्यान व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 06:04 IST

योगेश रामचंद्र कळमकर असे  त्याचे नाव  असून १२ डिसेंबर २०१७ ते १५ ऑगस्ट २०२२ या दरम्यान  त्याने व्यवहार  केला होता.  

महाड :  एका ग्राहकाला सदनिका देण्याच्या नावाखाली २१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील एका बांधकाम व्यावसायिकावर महाड  शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश रामचंद्र कळमकर असे  त्याचे नाव  असून १२ डिसेंबर २०१७ ते १५ ऑगस्ट २०२२ या दरम्यान  त्याने व्यवहार  केला होता.  

कळमकर यांनी  साईयोग या इमारतीमध्ये ६५०  चौरस फुटांची सदनिका सुभाष गौरू पाटील यांना विकत दिली होती. त्याची किंमत २३ लाख रुपये आहे. परंतु या बिल्डरने ग्राहकाकडून २१ लाख रुपये घेऊन शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर साठेकरार करून दिलेला होता. असे असतानाही  कळमकर यांनी तो फ्लॅट परस्पर मीतेश चोपडा या अन्य ग्राहकाला विकला.

ही बाब लक्षात येताच पाटील यांनी कळमकर यांना फ्लॅट किंवा पैसे  परत मिळावेत, यासाठी मागणी केली. मात्र तो टाळाटाळ करीत असल्याने  पाटील यांनी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये   तक्रार दाखल केली आहे.  याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे हे करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी