शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 12:03 IST

20 years imprisonment for abusing a girl : बुलडाणा विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने साेमवारी आरोपीस २० वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मक्याच्या शेतात नेऊन एका आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बुलडाणा विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने साेमवारी आरोपीस २० वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.चिखली तालुक्यात ७ मार्च २०२० रोजी ही घटना घडली होती. गजानन ज्ञानबा मोरे (५०) असे आरोपीचे नाव आहे. एका गावातील काही महिला आणि आरोपी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये टोमॅटो तोडण्यासाठी गेले होते. यामध्ये पीडित मुलीचाही समावेश होता. पीडित आठ वर्षीय बालिका शेतातील कोठ्याजवळ  खेळत होती. आरोपीने पीडित बालिकेस मक्याच्या शेतात पाइप उचलण्यासाठी चल, असे म्हणून दुसरीकडे शेतात घेऊन गेला. तिथे कोणीही नसताना आरोपीने बालिकेवर बलात्कार केला. बालिकेने विरोध केला असता आरोपीने तिला ही बाब कोणालाही सांगू नको असे म्हणत घरी गेल्यावर २० रुपये देण्याचे आमिष दिले. संध्याकाळी जेव्हा पीडित बालिकेस त्रास होऊ लागला तेव्हा तिने संपूर्ण घटना तिच्या आईवडिलांना सांगितली़ या प्रकाराची तक्रार पीडितेच्या आईने अमडापूर पोलीस ठाण्यात दिली़ पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक करून त्याच्या विरोधात बलात्कार व पोस्काे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ न्यायालयाने या प्रकरणात वादी-प्रतिवादी पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपी गजानन मोरे यास बलात्कार आणि पोस्को कायद्याच्या कलमांतर्गत दोषी ठरवले. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी आरोपी गजानन मोरे यास ३० ऑगस्ट राेजी २० वर्षे कठोर कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीस एक महिन्याची साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

समाजातील अशा विकृत मानसिकता ठेवणाऱ्यांवर कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे, त्या दृष्टीने वादी पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद सुनावणीदरम्यान करण्याचा प्रयत्न केला. पीडितेला न्याय मिळवून दिल्याचे समाधान आहे.- ॲड. आशिष केसाळे, जिल्हा सरकारी वकील, बुलडाणा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा