शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

तलाठ्याने घेतली २० हजारांची लाच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 18:48 IST

- रेतीच्या वाहतुकीदरम्यान रेतीघाट कंत्राटदारावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना आरमोरी तालुक्यातील देऊळगावचा तलाठी मोतीलाल लहुजी राऊत (५४) याला रंगेहात पकडण्यात आले.

गडचिरोली - रेतीच्या वाहतुकीदरम्यान रेतीघाट कंत्राटदारावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना आरमोरी तालुक्यातील देऊळगावचा तलाठी मोतीलाल लहुजी राऊत (५४) याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई गडचिरोलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि.३०) केली. एसीबीकडून प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारकर्ता हे रेती कंत्राटदार आहे. रेती घाट घेणाºया मुख्य कंत्राटदाराशी करारनामा करून ते आपल्या दोन सहकारी कंत्राटदारांसह नदीतील रेती काढून वाहतूक करीत असतात.सप्टेंबर महिन्यात सदर कंत्राटदारावर त्यांच्या रेती घाटावरून निघालेल्या रेतीच्या ट्रकवर कारवाई न करता सोडून देण्याचा मोबदला म्हणून देऊळगाव साजा क्र.१९ चे तलाठी मोतीलाल राऊत यांनी एक लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ८० हजार देण्याचे ठरले. याशिवाय रेती वाहतूक करताना तीन महिन्यात कोणतीही कारवाई न करण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी राऊत याने केली. दरम्यान रेती कंत्राटदाराने एसीबीकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार मंगळवार दि.३० रोजी एकूण लाचेपैकी पहिला हप्ता २० हजार रुपये घेताना तलाठी राऊत याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, नायक सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, तसेच देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, महेश कुकुडवार, तळशीदास नवघरे, घनश्याम वडेट्टीवार, सोनल आत्राम, सोनी तवाडे आदी कर्मचाºयांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली