शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या व्यवहारात २० लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 04:31 IST

अकोले येथील १.१८ हेक्टर जमीन चंद्रकांत लामखडे यांनी ५१ लाख ५१ हजारांमध्ये विकल्यानंतर त्यातील २० लाख एक हजार रुपये घेऊनही व्यवहार पूर्ण केला नाही.

ठाणे : अकोले येथील १.१८ हेक्टर जमीन चंद्रकांत लामखडे यांनी ५१ लाख ५१ हजारांमध्ये विकल्यानंतर त्यातील २० लाख एक हजार रुपये घेऊनही व्यवहार पूर्ण केला नाही. सुरेश मोरे (४६, रा. वर्तकनगर) यांचे पैसेही परत न करणाऱ्या लामखडे यांच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.मोरे यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील वडझोरे येथील असून त्यांची तिथे वडिलोपार्जित मालमत्ताही आहे. किसन गोपाळे, निवृत्ती जाधव या ठाण्यातील मित्रांसह ते गावी जमीनखरेदी करण्यासाठी शोध घेत होते. त्यानुसार, एका इस्टेट एजंटमार्फत चंद्रकांत लामखडे (मु. जाचकवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर) यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेव्हा लामखडे यांनी त्यांची १.१८ हेक्टर जमीन, पक्के घर आणि गोठ्यासह विक्री करावयाची असल्याचे सांगितले. २० फेब्रुवारी २०१७ रोजी लामखडे हे मुलगा नितीन आणि मित्र अमोल बोडखे यांच्यासमवेत ठाण्यात आले होते. त्यावेळी गोपाळे, जाधव आणि संध्या खिल्लारी या तीन भागीदारांसह मोरे यांनी ही जमीन ५० लाख ५१ हजारांमध्ये विकत घेतली. सुरुवातीला २३ फेब्रुवारी २०१७ मध्ये ५१ हजारांची आणि २० मार्च २०१७ मध्ये ५० हजारांची अशी एक लाख एक हजारांची रक्कम मोरे यांनी दिली. त्यानंतर जाधव, गोपाळे आणि खिलारे यांनी साडेसहा लाखांची रक्कम दिली. जून २०१७ पर्यंत या चौघांनी त्यांना २० लाख एक हजारांची रक्कम धनादेश आणि रोख स्वरूपात दिली. पुढे वेगवेगळी कारणे देत लामखडे यांनी जमिनीचा व्यवहार करण्यास नकार दिला. वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी हे पैसेही मोरे यांच्यासह चौघांना परत केले नाही. अखेर, त्यांनी आधी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. त्याच्या चौकशीतून याप्रकरणी मोरे यांनी याप्रकरणी १ फेब्रुवारीला २० लाखांच्या अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सी.एन. यादव तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे