शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

By चैतन्य जोशी | Updated: June 28, 2025 13:33 IST

शेताचा वाद, निमसडा गावात ‘डबल मर्डर’ आरोपी महेंद्रने साधना आणि तिचा मुलगा नितीन यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करत दोघांना खल्लास केले.

चैतन्य जोशी

वर्धा - शेतीच्या हिस्सेवाटणीच्या कारणातून झालेल्या वादात पुतण्याने माय-लेकाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना अल्लीपूर ठाण्यांतर्गत निमसडा गावात घडली. विशेष म्हणजे माय-लेकाची हत्या केल्यानंतर आरोपीनेही विष पिऊन आत्महत्या केली. ही थरारक घटना २८ रोजी सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास घडली. 

साधना सुभाष मोहिजे (४५ रा. निमसडा), नितीन सुभाष मोहिजे (२८ रा. निमसडा) अशी मृतांची नावे आहे. तर आरोपी असलेला पुतण्या महेंद्र भाऊराव मोहिजे (४७ रा. निमसडा) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत साधना आणि तिचा पुतण्या आरोपी महेंद्र यांच्यात शेतीचा वाद होता. याच वादातून २८ रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्याच शेतात तिघांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपी महेंद्रने साधना आणि तिचा मुलगा नितीन यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करत दोघांना खल्लास केले. या घटनेने अल्लीपूर गाव परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिस दल दाखल निमसडा गावात घटना घडताच घटनास्थळी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली. अल्लीपूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निमसडा गावात दाखल झाले होते. 

आरोपीची आत्महत्या आरोपी पुतण्या महेंद्र मोहिजे याने साधना व तिच्या मुलाला ठार मारल्यानंतर आरोपी महेंद्रने विष प्राशन केले. त्याला तत्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मात्र, त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण वर्धा जिल्ह्याला हादरा बसला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी