शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

केरळमध्ये नरबळी देणारे नरभक्षक असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 05:33 IST

महिलांचे अवयव कापून रक्तस्त्राव होऊ देण्यात आला. एका मृतदेहाचे ५६ तुकडे करण्यात आल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले.

तिरुअनंतपुरम : केरळमधील एका जोडप्याने लवकर श्रीमंत होण्याच्या लालसेतून दोन महिलांचा नरबळी दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आणखी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नरबळीचा आरोप असलेल्या जोडप्याने बळींचे मांस खाल्ले असावे, असा धक्कादायक नवीन तपशील समोर आल्याचे एर्नाकुलमचे पोलीस आयुक्त सी. एच. नागराजू यांनी बुधवारी सांगितले.मृत रोसेलीन, पद्मा यांना गळा दाबून मारण्यापूर्वी त्यांचा बांधून अतोनात छळ करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. महिलांचे अवयव कापून रक्तस्त्राव होऊ देण्यात आला. एका मृतदेहाचे ५६ तुकडे करण्यात आल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले.

मोहंमद शफी लैंगिक विकृतमुख्य आरोपी मोहंमद शफी आहे. तो लैंगिक विकृत आणि कायम दुःखी राहणारा आहे. त्याने महिलांना भागवल सिंग आणि त्याची पत्नी लैला यांच्या घरी आणले. २०२० मध्ये एका ७५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात शफी जामिनावर बाहेर होता. शफीने यापूर्वीही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे केल्याचे पाेलिसांनी सांगितले.

चित्रपटात काम देण्याचे आमिषशफीने पीडितांना एका अश्लील चित्रपटात काम करण्यासाठी पैसे देण्याचे वचन दिले होते. भागवल सिंग आणि लैला हे आर्थिक संकटात होते. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी शफीने आणि श्रीमंत होण्यासाठी नरबळी देण्याचा सल्ला दिला होता, असे पोलिसांनी सांगितले. त्यासाठी दाेन महिलांना ताे त्यांच्याकडे घेऊन गेला होता.

डॉक्टरचा राजकीय कनेक्ट?मसाज थेरपिस्ट भागवल सिंग सत्ताधारी सीपीआय (एम) शी संबंधित आहेत, असा आरोप होत आहे. पक्षाने मात्र ते पक्षाचे सदस्य असल्याचे नाकारले आहे. ‘तो आमच्यासोबत काम करत होता, पण आमच्या पक्षाचा सदस्य नव्हता. त्याच्या दुसऱ्या लग्नानंतर तो धार्मिक व्यक्ती बनला. कदाचित त्याच्या पत्नीचा प्रभाव असेल,’ असे सीपीआयचे पीआर प्रदीप म्हणाले.

फेसबुकवरून झाला हाेता सर्वांचा संपर्कशफी हा राेसेलीन आणि पद्मा यांच्याशी फेसबुकवरून संपर्कात आला हाेता. आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांना ताे जाळ्यात अडकवायचा. यासाठी ताे त्याच्या पत्नीचाही वापर करून घेत हाेता, असे तपासात उघड झाले आहे. याच माध्यमातून ताे भागवाल सिंह आणि त्याच्या पत्नीच्या संपर्कात आला हाेता.

टॅग्स :Keralaकेरळ