शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पतीचा मोबाईल चाळण्यात गमावले दोन कोटी; महिलेचा मेसेज दिसला, म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 18:30 IST

गुन्हा दाखल : बीएआरसी अधिकाऱ्याच्या पत्नीची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बीएआरसी मध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या पत्नीची १ कोटी ९२ लाखाची फसवणूक झाली आहे. कामाच्या ठिकाणी मोबाईल वापराला अनुमती नसल्याने या अधिकाऱ्याचा मोबाईल घरीच होता. यावेळी पत्नी पतीचा मोबाईल चाळत असताना नजरेस पडलेल्या लिंकला भुलून त्यांनी ही रक्कम गमावली आहे. 

पतीच्या पश्चात पतीचा मोबाईल चाळणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. पनवेल परिसरात राहणाऱ्या या महिलेचे पती बीएआरसीमध्ये अधिकारी आहेत. कामाच्या ठिकाणी मोबाईल आणण्यास मनाई असल्याने पतीचा मोबाईल घरीच असतो. दोन महिन्यांपूर्वी पत्नी पतीचा मोबाईल हाताळत असताना रितू व्होरा नावाच्या महिलेचा मॅसेज पत्नीच्या नजरेस पडला. यामुळे त्यांनी मॅसेज वाचला असता त्यामध्ये ट्रेडिंगद्वारे होणाऱ्या नफ्याची माहिती दिली होती. त्यावर विश्वास ठेवून महिलेने ६० लाख गुंतवले होते. त्यामधून १२ लाखाचा नफा झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे आपला फायदा होत असल्याचे समजून त्यांनी दोन महिन्यात टप्प्या टप्प्याने तब्बल १ कोटी ९२ लाख रुपये संबंधितांच्या खात्यावर जमा केले होते. इंदिरा सिक्युरिटी या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे त्यांच्याकडून ही रक्कम घेण्यात आली होती. परंतु दोन महिने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले नव्हते.

दरम्यान २ फेब्रुवारीला तेलंगणा येथे फसवणूक झाल्याची तक्रार एका व्यक्तीने केली होती. त्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरु असताना गुन्हेगारांच्या खात्यावर या महिलेची देखील मोठी रक्कम आल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता फसवणूक झाल्याची जाणीव त्यांना झाली. 

टॅग्स :fraudधोकेबाजी