आपल्याच पित्याची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे ते ड्रम करून १९ वर्षांच्या अक्षत प्रताप सिंहला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आशियाना पोलिसांनी जेव्हा अक्षतला मेडिकल आणि सीन रिक्रिएशनसाठी रुग्णालयात नेले, तेव्हा त्याने प्रसारमाध्यमांसमोर आपली चूक मान्य केली. "माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, हे सर्व चुकून घडलं," अशी कबुली त्याने दिली आहे.
नेमकी घटना काय?
२० फेब्रुवारीच्या पहाटे साडेचारच्या सुमारास १९ वर्षीय अक्षत आणि त्याचे ५० वर्षीय वडील मानवेंद्र सिंह यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात अक्षतने वडिलांवर गोळी झाडली. गोळी लागताच मानवेंद्र सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर अक्षतने जे केलं ते ऐकून कोणाचेही हातपाय लटलटतील.
पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी क्रूरतेची सीमा ओलांडली
वडिलांची हत्या केल्यानंतर अक्षत घाबरला नाही, तर त्याने पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले. त्याने तिसऱ्या मजल्यावर हत्या केल्यानंतर मृतदेह ओढत तळमजल्यावर आणला. तिथे एका रिकाम्या खोलीत नेऊन त्याने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले. काही अवयव त्याने बाहेर फेकून दिले, तर उरलेले धड एका निळ्या रंगाच्या ड्रममध्ये लपवून ठेवला. दुर्गंधी सुटल्याने हे प्रकरण उघडकीस आले आणि पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अक्षतला ताब्यात घेतले.
अभ्यासाचा ताण की रागाचा उद्रेक?
पोलिसांनी जेव्हा अक्षतला विचारले की, "तुझ्यावर परीक्षेचा काही दबाव होता का?" त्यावर त्याने मान हलवून 'हो' असे उत्तर दिले. तसेच, या भयानक हत्याकांडात त्याची बहीणदेखील सामील आहे का? असा प्रश्न विचारला असता, त्याने बहिणीचा सहभाग नाकारला आहे. हे सर्व कृत्य त्याने एकट्यानेच केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
पोलिसांची कारवाई
लखनौच्या आशियाना पोलिसांनी अक्षतवर हत्येचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लोकबंधु रुग्णालयात त्याचे मेडिकल करण्यात आले असून, पोलीस आता हत्येसाठी वापरलेले शस्त्र आणि मृतदेहाचे इतर अवशेष शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. एका सुशिक्षित कुटुंबातील मुलाने अभ्यासाच्या तणावाखाली किंवा रागाच्या भरात इतके क्रूर पाऊल उचलल्यामुळे समाजमनात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Summary : A 19-year-old in Lucknow killed his father after an argument, dismembered the body, and hid it in a drum. He confessed to the crime, claiming it happened accidentally, shocking investigators during the scene recreation. Police are investigating the motive and searching for missing body parts.
Web Summary : लखनऊ में एक 19 वर्षीय युवक ने बहस के बाद अपने पिता की हत्या कर दी, शव के टुकड़े कर दिए और उसे एक ड्रम में छिपा दिया। उसने अपराध कबूल करते हुए कहा कि यह गलती से हुआ, जिससे सीन रिक्रिएशन के दौरान जांचकर्ता स्तब्ध रह गए। पुलिस मकसद की जांच कर रही है और लापता अंगों की तलाश कर रही है।