शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

विक्रीकर अधिकाऱ्याकडून १७५ कोटीं ९३ लाखांचा गैरव्यवहार; एसीबीकडून गुन्हा दाखल

By मनीषा म्हात्रे | Updated: March 1, 2024 17:54 IST

१६ बोगस कंपन्यांना कर परतावा

मुंबई : विक्रीकर अधिकाऱ्यानेच पदाचा गैरवापर करत, बनावट कागदपत्रांद्वारे भासवलेल्या १६ कंपन्यांना १७५ कोटी ९३ लाख १२ हजार ६२२ रुपयांचा कर परतावा मंजूर करत शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीत समोर आला आहे. याप्रकरणी एसीबीने लाळगेसह १६ कर दात्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन वस्तू व सेवा विभागाचे अधिकारी तसेच विक्रीकर अधिकारी म्हणून कार्यरत अमित गिरीधर  लाळगे (४४) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. लाळगेकडे घाटकोपर विभाग नोडल ११ चा पदभार असताना, ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान ही फसवणूक झाली आहे. १६ करदात्यानी त्यांच्या व्यवसायाचे ठिकाणांचे बनावट व खोटे भाडेकरारपत्र सादर करून जीएसटीएन कमांक प्राप्त केले. त्यानंतर या करदात्यांनी शासनाला कोणताही कर भरला नसतानाही एकूण १७५ कोटी ९३ लाख १२ हजार ६२२ रुपयांच्या कर परताव्यासाठी ३९ करपरतावे अर्ज सादर केले होते.

लाळगेने  या अर्जाबाबत कोणतीही शहानिशा केली नाही. तसेच हे करदाते बनावट असल्याचे जीएसटी पोर्टलवरील बीओ सिस्टीम मध्ये दिसत असतानाही  अमित लाळगेने हे करपरतावे अर्ज मंजूर केले. १६ जणांशी संगनमताने स्वतःसह कर दात्यांच्या फायद्यासाठी अपात्र परतावा मंजुर करून १६ करदात्यांना एकूण १७५ कोटी ९३ लाख १२ हजार ६२२ रुपये वितरीत करून शासनाची फसवणूक केली. ही बाब समोर येताच, एसीबीने लाळगेसह १६ कर दात्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या कंपन्याबाबत अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMumbaiमुंबई