शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! १७ वर्षीय मुलगी मोबाईल चार्जला लावून बेडवर झोपली; सकाळी सापडला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 15:40 IST

अलीकडच्या काळात स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात असून तो जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे.

एक सतरा वर्षीय मुलगी तिचा मोबाईल चार्जिंगला लावून झोपी गेली. झोपेत मोबाईल तिच्या अंगाखाली होता. तेव्हा इलेक्ट्रिक शॉक लागल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मुलीच्या मृत्यूनंतर फोन चार्जर्सच्या सुरक्षेवर सोशल मीडियात वादंग निर्माण झाले आहे. हे प्रकरण कंबोडिया येथील आहे. तेथील १७ वर्षीय खोर्न सेरे पोव(Khorn Srey Pov) तिच्या मोबाईलवर मृत अवस्थेत आढळली. ती एका गोल्ड माइनिंग कंपनीत काम करत होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, खोर्न सेरे आंघोळ केल्यानंतर बेडवर झोपली होती. बेडवर तिने मोबाईल चार्जर प्लगमध्ये कनेक्ट करून ठेवला आणि फोन चार्ज करत होती. मोबाईलचा टॉर्च ऑन होता. चार्जिंगवेळी तिचा डोळा लागला आणि ती झोपून गेली. तेव्हा अचानक तिला विजेचा जोरदार शॉक लागला. या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला. 

२७ जुलैला विजेचा शॉक लागून मुलीचा झोपेत मृत्यू झाला होता. करंट लागण्यापूर्वी मुलीने आंघोळ केली होती. त्यानंतर बेडवर मोबाईल चार्जर प्लगला लावून ठेवला होता. त्या प्लगने ती मोबाईल चार्ज करू लागली. मात्र त्यानंतर ही घटना घडली. या घटनेची सोशल मीडियात बरीच चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर नेटिझन्स मोबाईल फोनच्या चार्जरबाबत टीका करत आहेत. त्यात काही वादही झाले आहेत.  

अलीकडच्या काळात स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात असून तो जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करतो तेव्हा त्यासोबत चार्जर मिळतो पण अनेकदा तो लवकर खराब झाल्याचा अनुभव काही लोकांना येतो. त्यामुळे पुन्हा नवीन घ्यावा लागतो. स्मार्टफोनचा वापर करताना अनेकांचे चार्जर हे लवकर खराब होते. हे चार्जर कितपत सुरक्षित आहेत सांगता येत नाही. 

उत्तर प्रदेशात कुटुंब झालं होतं उद्ध्वस्त काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये घडली होती. सहारनपूर जिल्ह्यात मोबाईल चार्ज करताना विजेचा धक्का लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिची दोन मुले होरपळली होती. अनेकदा रात्रीच्या वेळी लोक फोन चार्ज होत असतानाच वापरतात आणि झोपताना चार्जिंगवर ठेवतात, जेणे करून तो सकाळी पूर्णपणे चार्ज असावा. पण यामुळे मोठा अपघातही होण्याची शक्यता असते. 

टॅग्स :Mobileमोबाइल