शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थ विक्री प्रकरणात १७ जणांना लावला ‘माेक्का’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 07:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : अमलीपदार्थ विक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : अमलीपदार्थ विक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. त्यांच्याकडून ७० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, या प्रकरणात सहभागी असलेल्या चौघांचा शोध सुरू आहे. टोळीचा म्होरक्या गुफरान हन्नान शेख हा आहे. त्याच्यासह १७ आरोपींवर मोक्का लावल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. 

या कारवाईत १५० किलो गांजा,  कार, दुचाकी, रिक्षा, पिस्तूल, २ काडतुसे, २ वॉकीटॉकी, चार्जरसह ७० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. टोळीचा म्हाेरक्या गुफरान याच्यावर खडकपाडा,  बाजारपेठ, भिवंडी, कल्याण ग्रामीण, मुंब्रा, डायघर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

मुंबई, ठाणे, पुण्यासह तेलंगणात गुन्ह्यांची नोंद गुफरानसह बाबर शेख, सुनील राठोड, आझाद शेख, रेश्मा अल्लाद्दीन शेख, शुभम उर्फ सोन्या भंडारी, आसिफ शेख, सोनू सय्यद, प्रथमेश नलावडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश भिताडे आणि योगेश जोध अशी आरोपींची नावे आहेत.हे आरोपी बल्याणी, आंबिवली, बदलापूर, शिळफाटा, पुणे, मुंबई, सोलापूर या भागातील राहणारे आहेत. यापैकी बाबर शेखविरोधात बदलापूर पोलिस ठाण्यात, सुनील राठोड याच्यावर बदलापूर, मुंबई, ठाण्यात, तर आझाद शेख याच्यावर कल्याणमध्ये दोन, शुभम भंडारी याच्या विरोधात पुणे, तेलंगणा, खडकपाडा आणि योगेश जोध याच्या विरोधात पुणे, खडकपाडा पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : 17 booked under MCOCA in Kalyan drug peddling case.

Web Summary : Kalyan police arrested 13, including a woman, for drug trafficking, seizing ₹70 lakh worth of goods. 17, including kingpin Gufran Sheikh, are booked under MCOCA. The accused have prior offenses in Mumbai, Thane, Pune, and Telangana.
टॅग्स :kalyanकल्याण