शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कंटेनरमधून १.५९ कोटीच्या मोबाईलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 23:55 IST

पांजरी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या कंटेनगरमधून १.५९ कोटी रुपयांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. तीन महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपांजरी टोल नाक्यावरील घटना, तीन महिन्यानंतर झाला गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पांजरी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या कंटेनगरमधून १.५९ कोटी रुपयांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. तीन महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील रहिवासी चालक आदेश कुमार कथेरिया (३४) हा १० कोटी रुपयांचे मोबाईल घेऊन कंटेनर क्रमांक आर. जे. ११, जीबी-५६६६ ने हरियाणाला जात होता. कंटेनरमध्ये आदेश कुमार याच्या शिवाय दुसरे कुणीही नव्हते. आंध्रप्रदेशवरून रवाना झाल्यानंतर तो यवतमाळ मधील पांढरकवडा येथे पोहोचला. तेथे धाब्यावर भोजन केल्यानंतर तो झोपी गेला. काही वेळ आराम केल्यानंतर १८ मार्चला दुपारी बेलतरोडी ठाण्यांतर्गत पांजरी टोल नाक्यावर पोहोचला. तेथे आदेश कुमारने कंटनेरच्या टायरची हवा तपासली. त्याला कंटेनरचे सील आणि सेंटर लॉक तोडण्यात आल्याचे समजले. कंटेनरची तपासणी केली असता मोबाईल चोरीला गेल्याचे समजले. या घटनेची बेलतरोडी ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. आदेश कुमार काही वेळासाठीच पांजरीला उतरला होता. दरम्यान तो कंटेनरजवळ उभा होता. पांढरकवडा येथे कंटेनर बराच वेळ उभा होता. यामुळे हे प्रकरण यवतमाळ पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. पांढरकवडा पोलिसांनी त्यांच्या परिसरात चोरी झाली नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कंटेनरमधून ओप्पो कंपनीचे २३६० मोबाईल चोरी झाल्याची माहिती आहे. त्यांची किंमत १.५९ कोटी रुपये आहे. आता तीन महिन्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलtheftचोरी