शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दिग्दर्शक सिद्धार्थ जेना यांना १.५३ कोटीचा गंडा; १० जणांविरोधात बांगूर पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 07:58 IST

गोव्यातील जमीन आणि फ्लॅट्समध्ये गुंतवणूक केल्यास फायदेशीर परतावा देण्याचे आश्वासन देत फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गोव्यातील जमीन आणि फ्लॅट्समध्ये गुंतवणूक केल्यास फायदेशीर परतावा देण्याचे आश्वासन देत चित्रपट दिग्दर्शक सिद्धार्थ जेना (५०, गोरेगाव पश्चिम) यांची १.५३ कोटी रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी १० आरोपींविरुद्ध बांगूर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रमदेव दर्शनराम मल्होत्रा, रितू विक्रमदेव मल्होत्रा, मारिया फर्नांडिस, राल्स्टन पिंटो, लीना मांद्रेकर, प्रमोद मांद्रेकर, लिओ डायस, रश्मी चोडणकर, ज्युडो सॅली गोम्स आणि साईनाथ पाटेकर, अशी आरोपींची नावे आहेत.

जेना यांची ओळख २०२० मध्ये विक्रमदेव मल्होत्रा याच्याशी एक विश्वसनीय रिअल इस्टेट एजंट म्हणून झाली. नोव्हेंबर २०२० मध्ये, ते मल्होत्रा याला भेटले. त्याने जेना यांना त्यांच्या वेबसाइटवर मालमत्ता दाखवल्या. जेनाने उत्तर गोव्यात ८४ लाखांचा प्लॉट निवडला आणि २५ हजार रुपये टोकन दिले. जेना यांनी नंतर जमीन मालकांना एकूण १० लाखांचे धनादेश दिले. मार्च २०२१ मध्ये, कोविड-१९  महामारीच्या काळात, मल्होत्रा याने जेना यांना जमिनीची किंमत तिप्पट होईल, असे आश्वासन देऊन आणखी भूखंड खरेदी करण्यासाठी तयार केले.

जेना यांनी बँक ट्रान्स्फर आणि रोखीने ४८.५९ लाख आणि मल्होत्राच्या बँक खात्यात ९१ लाख भरले. मात्र, दोन वर्षांपासून मल्होत्राने जेना यांच्या नावावर जमीन हस्तांतरित करण्यास विलंब केला आणि त्यांचे पैसेही परत करण्यास टाळाटाळ केली. मात्र, जुलै २०२३ मध्ये मल्होत्रा याने दिलेला चेक बाउन्स झाल्यावर जेना यांनी तक्रार दाखल केली. इतर आरोपींनी जमीन मालक असल्याचे भासवून मल्होत्रा यांना फसवणुकीत मदत केली. दरम्यान, जेना यांच्या तक्रारीआधारे बांगूरनगर पोलिसांनी २७ मे रोजी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

टॅग्स :fraudधोकेबाजीgoaगोवाMumbaiमुंबई