शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पोलिसांंच्या बदनामीसाठी दीड लाख बनावट अकाउंट; सायबर, फॉरेन्सिक विभागाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:33 IST

Mumbai Police : देश-विदेशातून तयार केलेल्या बनावट खात्यांपैकी बहुतांश बंद करण्यात आली आहेत. बदनामीची माेहीम कोणी सुरू केली, यामागे कोण होते, याचा तपास करण्याच्या सूचना मुंबई पोलिसांना देण्यात आल्या आहेत, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

 - जमीर काझी

मुंबई :  अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलीस व राज्य सरकारच्या बदनामीसाठी सोशल मीडियावर तब्बल दीड लाख बनावट अकाउंट उघडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायबर व फॉरेन्सिक विभागाने त्याबाबतचा अहवाल मुंबई पोलिसांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.देश-विदेशातून तयार केलेल्या बनावट खात्यांपैकी बहुतांश बंद करण्यात आली आहेत. बदनामीची माेहीम कोणी सुरू केली, यामागे कोण होते, याचा तपास करण्याच्या सूचना मुंबई पोलिसांना देण्यात आल्या आहेत, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. सुशांतने १४ जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र त्यानंतर काही दिवसांतच मुंबई पोलीस तपासात दिरंगाई करीत आहेत, शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणात सहभाग आहे, त्यांना वाचविले जात आहे, अशा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या जात होत्या.सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर तपास सीबीआयकडे सोपविला गेला, त्यानंतर मुंबई पोलिसांवर सोशल मीडियावरून टीका होऊ लागली. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकवर सुशांतच्या कुटुंबाला पाठिंबा देणारे पोस्ट, हॅशटॅग सुरू झाले. मात्र सीबीआय तपासातून अद्याप काहीही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.एम्सने सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल दिल्याने मुंबई पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे राज्य सरकारने या कालावधीत सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सायबरने फेक अकाउंटबद्दल माहिती घेतली आहे. त्यामध्ये ५ महिन्यांत तब्बल दीड लाख बनावट अकाउंट असल्याचे उघडकीस आले. त्यातील अनेक अकाउंट चीन, नेपाळ, दुबईतून तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत