शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराच्या पत्नीकडे मागितले १५ कोटी रुपये, फेक कॉल करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 06:46 IST

याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात अनोळखी  व्यक्तीविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तोतया अधिकाऱ्याने १५ कोटींची मागणी करणारा कॉल आल्याने खळबळ उडाली. भोसले यांच्या पत्नीला हा ईडी अधिकाऱ्याच्या नावाने कॉल आला. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात अनोळखी  व्यक्तीविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीराव भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यासंबंधी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अनिल भोसले हे सध्या ईडीच्या अटकेत आहेत. २५ फेब्रुवारी २०२० रोजी पुण्यातील शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यासंबंधी पोलिसांनी अटक केली होती. भोसले हे शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आणि संचालक होते.  

ईडी अधिकाऱ्याची तक्रारईडीच्या मुंबई कार्यालयातील सहायक निदेशक सुनील कुमार (५६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. आरोपीने ईडी अधिकारी असल्याची बतावणी करत रेश्मा भोसले यांच्याशी संपर्क साधला. भोसले यांना तुरुंगातून सोडविण्यासाठी १५ कोटींची मागणी केली. त्यानुसार भोसले यांच्या पत्नीने तत्काळ ईडी अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले. कोणीतरी ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करत खोटा कॉल केल्याचे स्पष्ट होताच ईडी अधिकाऱ्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी