शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! १४ वर्षीय मुलीनं लोखंडी तव्यानं केली आईची निर्घृण हत्या; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 12:32 IST

महिलेच्या शरीरावर २०-२२ वार केल्याच्या खूणा आढळून आल्या. तिचा कानही कापण्यात आला होता.

नोएडा – राष्ट्रीय राजधानी दिल्लीनजीक नोएडा येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका १४ वर्षीय मुलीनं स्वत:च्या आईचीच निर्घृण हत्या केली आहे. संतापाच्या भरात या मुलीनं हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. रागात या अल्पवयीन मुलीने आईवर तव्याने २०-२२ वार केले. त्यामुळे आईचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मुलीच्या कुटुंबालाही धक्का बसला आहे. हत्येचं कारण ऐकून पोलीसही हैराण आहेत.

पोलिसांनी आरोपी मुलीला घेतलं ताब्यात

उत्तर प्रदेशच्या गौतमबुद्ध नगर परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या मुलीनं तिच्या आईवर जड वस्तूने प्रहार केल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी १४ वर्षीय मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेत वापरण्यात आलेला लोखंडी तवाही पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने तिला ज्युवेनाईल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले.

महिलेच्या शरीरावर २०-२२ वार

या घटनेबाबत नोएडा एडिशनल डिप्टी पोलीस कमिश्नर रणविजय सिंह म्हणाले की, अनुराधा नावाच्या ३४ वर्षीय महिलेला गंभीर अवस्थेत नोएडा येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यासाठी आणलं होतं. याठिकाणी उपचाराआधीच डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तपास सुरु केला. महिलेच्या शरीरावर २०-२२ वार केल्याच्या खूणा आढळून आल्या. तिचा कानही कापण्यात आला होता. या प्रकरणी मृत महिलेच्या भाऊ मुकेश राठोडनं भाचीविरोधात तक्रार दिली. त्यानंतर कलम ३०४ अंतर्गत गुन्हा नोंद करत पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतलं.

मुलीनं का केली आईची हत्या?

पोलीस तपासावेळी आरोपी मुलीनं सांगितले की, आईच्या चारित्र्यावरुन तिचे शाळेतील मित्र नेहमी टोमणे मारायचे. आई माझ्याशीही नेहमी वाद घालायची. त्यामुळे मी नेहमी त्रस्त होते. त्यामुळे मी तिच्यावर हल्ला केला आणि भीतीपोटी फ्लॅटच्या बाहेर निघून गेली. काही वेळाने ती घरी आली आणि शेजाऱ्यांना सांगून कुणीतरी आईवर हल्ला केल्याची बतावणी केली. मी खाली गेली होती. परत आल्यावर पाहिलं तर आई गंभीर अवस्थेत पडली होती. कुणीतरी आईला बेदम मारल्याचं ती म्हणाली. मात्र पोलिसांना मुलीच्या जबाबावर संशय आला त्यामुळे त्यांनी कसून चौकशी केली तेव्हा अल्पवयीन मुलीने हत्येची कबुली दिली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश