शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'न्हावा-शेवा' तून जप्त केल्या 14 कोटींच्या विदेशी सिगारेट, मुंबई डीआरआय विभागाने केली कारवाई  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 01:26 IST

Uran : उत्तर प्रदेशमधील माफिया टोळीमार्फत दुबईहून भारतात परदेशी सिगारेटची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून मिळाली होती.

उरण : न्हावा शेवा बंदरातून मुंबई डीआरआय विभागाने शनिवारी दुबईहून देशात तस्करी केली जात असलेल्या विदेशी सिगरेटचा साठा जप्त केला आहे. या सिगारेट ॲल्युमिनियम कचरा आणि वाहन इंजीनच्या स्पेअरपार्टमध्ये लपवून ठेवण्यात आल्या होत्या. या सिगारेट साठ्याची किंमत १४ कोटी रुपयांच्या घरात आहे.उत्तर प्रदेशमधील माफिया टोळीमार्फत दुबईहून भारतात परदेशी सिगारेटची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर न्हावा-शेवा बंदरातून डीआरआय अधिकाऱ्यांनी संशयित कंटेनर ताब्यात घेतला. कंटेनरची कसून तपासणी करताना कंटेनरमध्ये ॲल्युमिनियमचे भंगार आणि इंजीनच्या स्पेअरपार्टच्या नावाखाली आलेल्या सामानात लपवून ठेवलेल्या विदेशी सिगरेटचा साठा सापडला. सीमाशुल्क अधिनियम १६२च्या तरतुदीनुसार सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती डीआरआय सूत्रांनी दिली. 

सहा महिन्यांतील तिसरी घटना nन्हावा शेवा बंदरात मागील सहा महिन्यांच्या कालावधीत घडलेली ही तिसरी घटना आहे. चार महिन्यांपूर्वी दुबईतून आयात करण्यात आलेला १२ कोटी किमतीच्या सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी