शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

१३७ बळी घेणारे चालक मोकाटच; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये अपघात करून झाले फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 01:42 IST

Crime News : रस्ते अपघात ही नवी मुंबईची गंभीर समस्या बनत चालली आहे. अपघाताला कारणीभूत ठरणारी रस्त्यावरील परिस्थिती तसेच वाहनचालकांचा बेशिस्तपणा यामुळे हे अपघात घडत आहेत.

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : मागील दोन वर्षांत नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरात अपघातांमध्ये ५०३ जणांचा बळी गेला आहे. त्यापैकी १३७ जणांचा बळी घेणारे वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाल्याने ते अद्यापही मोकाटच आहेत. भविष्यातही त्यांच्याकडून अपघात घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये बेशिस्त वाहनचालकांविषयी दहशत निर्माण झाली आहे.रस्ते अपघात ही नवी मुंबईची गंभीर समस्या बनत चालली आहे. अपघाताला कारणीभूत ठरणारी रस्त्यावरील परिस्थिती तसेच वाहनचालकांचा बेशिस्तपणा यामुळे हे अपघात घडत आहेत. अनेकदा अपघात करून वाहनचालक घटनास्थळावरून पळदेखील काढतात. त्यामुळे बहुतांश अपघातांचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. नुकतेच पामबीच मार्गावर एपीएमसी येथे घडलेल्या अपघातामध्ये पोलीसपुत्र भावंडांना प्राण गमवावा लागला आहे. याप्रकरणी कार चालवणाऱ्या हॉटेल व्यावसायिक रोहन अबॉट याने घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. या गुन्ह्यात न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. अशाच अपघातांमध्ये नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरात दोन वर्षांत ५०३ जणांचा बळी गेला आहे. त्यापैकी २३२ जणांचा मृत्यू गतवर्षात झाला असून, २०१९ मध्ये २७१ जणांनी अपघाती प्राण गमावले आहेत. त्यापैकी १३७ जणांचा बळी घेणारे वाहनचालक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसल्याने ते मोकाटच आहेत. त्यामध्ये २०२० मधील ७८, तर २०१९ मधील ५९ अपघातांचा समावेश आहे. सायन पनवेल मार्ग, ठाणे बेलापूर मार्ग, तसेच पामबीच व शहरांतर्गतच्या मार्गावर घडलेले हे अपघात आहेत.मागील दोन वर्षांत नवी मुंबईत तब्बल १,३३४ अपघात घडले आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात