शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

South Africa riots: दक्षिण आफ्रिकेमध्ये 13 लाख भारतीय संकटात; गुप्ता बंधूंच्या 'पापा'ची भोगतायत शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 16:55 IST

UP's Gupta Brothers Behind South Africa riots, looting and turmoil हिंसाचार जेकब जुमा यांना न्यायालयाने अवमान केल्याच्य़ा आरोपांखाली 15 महिन्यांची शिक्षा सुनावली व यानंतर जुमा यांनी आत्मसमर्पण केल्याने उसळला आहे. 

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब जुमा (former President Jacob Zuma) यांच्या अटकेनंतर तिथे मोठा आगडोंब उसळला आहे. अनेक भागात लुटालूट आणि हिंसाचार होत आहे. या हिंसाचाराचा मोठा फटका १३ लाख भारतीयांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. परिस्थीतीचे गांभीर्य पाहून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आफ्रिकेच्या मंत्र्यांना फोन करून चर्चा केली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या जो हिंसाचार सुरु आहे, त्याचा थेट संबंध उत्तर प्रदेशच्या गुप्ता बंधूंशी आहे. ('Worst civil unrest since 1994': How South Africa plunged into riots, looting and turmoil.)

जोहान्सबर्ग आणि क्वाजुलु नटालमध्ये भारतीयांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जात आहे. सध्या तरी 13 लाख भारतीय संकटात नाहीत, परंतू वारे वाहू लागले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारला सुरक्षा दलांना पाठविण्याची विनंती केली आहे, परंतू ते पाठवत नाहीएत असे तेथील भारतीय समुहाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. भारतीयांची दुकाने, व्यवसाय, कंपन्यांना आगी लावल्या जात आहेत. घरे पेटवली जात आहेत. लुटालूट सुरु आहे. राष्ट्राध्यक्ष रामफोसा यांनी देशाला संबोधताना संधीसाधू लोक परिस्थितीचा फायदा उठवत आहेत, असे म्हटले आहे. या घटना राजकीय किंवा समाजाविरोधात नाहीत, तर गुन्हेगारी स्वरुपाच्या आहेत. 

हा हिंसाचार जेकब जुमा यांना न्यायालयाने अवमान केल्याच्य़ा आरोपांखाली 15 महिन्यांची शिक्षा सुनावली व यानंतर जुमा यांनी आत्मसमर्पण केल्याने उसळला आहे. जुमा यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीला न्यायालयात हजर राहण्यास जुमा यांनी नकार दिला. यामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या भ्रष्टाचारात उत्तर प्रदेशच्या सहारनपूरच्या गुप्ता बंधूंचा हात आहे. ते देखील आरोपी असल्याने त्यांना युएईवरून आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

पन्नास अब्ज रँडच्या भ्रष्टाचारामध्ये जुमा मुख्य आरोपी असून तीन गुप्ता बंधू देखील यामध्ये आहेत. गुप्ता बंधूंनीच हा भ्रष्टाचार घडवून आणला आहे. त्यांनी जुमा यांच्या दोन मुलांनाही फायदा मिळवून दिला आहे. यामुळे भारतीयांना लक्ष्य केले जात आहे. 

टॅग्स :South Africaद. आफ्रिकाfraudधोकेबाजी