शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन गंडा घालणाऱ्याचे १३ लाख रुपये गोठविले, सांगलीत केली कारवाई

By शरद जाधव | Updated: March 19, 2023 20:39 IST

‘सायबर’ची कामगिरी, कस्टम डयूटी भरा म्हणून केली होती फसवणूक

शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: येथील डॉक्टर महिलेला फोन करून आपले पार्सल कस्टम कार्यालयाने जप्त केले असून त्याचा ९८ हजार ३२६ रुपये दंड भरावा लागेल म्हणत पैसे उकळणाऱ्याचे बँक खातेच सायबर पोलिसांनी गोठविले. सांगली सायबर पोलिसांच्या टिमने तक्रार येताच तात्काळ तपास सुरू करत हे खाते ब्लॉक केले. या खात्यावर १३ लाख २९ हजार रुपयांची रक्कम होती.

येथील डॉ. साेनिका मियापुरम यांना बुधवारी एक फोन आला. बोलणाऱ्या व्यक्तीने आपण सायबर क्राईम ब्रॅन्च मुंबईचा वरिष्ठ पोलिस अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. आपले एक पार्सल आले असून, ते कस्टम विभागाने जप्त करत आपल्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आपणास ९८ हजार ३२६ रुपयांचा दंड भरावा लागेल असे सांगितले. यानंतर डॉ. मियापुरम यांनी ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम त्या व्यक्तीच्या बँक खात्यावर भरली. परंतु, पैसे भरल्यानंतर त्यांना शंका आल्याने त्यांनी सायबर पोलिसात तक्रार केली.

यानंतर सायबरचे उपनिरीक्षक रोहिदास पवार यांच्या पथकाने फसवणूक करण्यात आलेली रक्कम येस बँकेच्या खात्यावर गेल्याचे शोधून काढले. यानंतर तात्काळ बँकेशी व्यवहार करून खात्याची माहिती घेतली. यावेळी या खात्यावर १३ लाख २९ हजार रुपये असल्याची माहिती मिळाली. यानंतर पुढील तपासासाठी हे बँकखाते गोठविण्यात आले आहे.सायबरचे उपनिरीक्षक पवार यांच्यासह सचिन कोळी, अमोल क्षीरसागर, करण परदेशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमSangliसांगली