शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षांच्या मुलाने धाडस केले, आईच्या खुन्याला खोलीत कोंडून पकडून दिले

By बाळकृष्ण परब | Updated: December 31, 2020 09:50 IST

Crime News : अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने धाडस करून आपल्या आईची हत्या करणाऱ्या आरोपील पकडून दिल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देमहिलेचा पती दिल्लीमध्ये नोकरी करतो. तर ही महिला मिरत येथे चालवत होती ब्युटी पार्लर या महिलेचे गेल्या १४ वर्षांपासून जावेद नावाच्या व्यक्तीशी होते अनैतिक संबंध महिला आरोपीसोबत असलेले अनैतिक संबंध संपुष्टात आणू इच्छित होती. मात्र आरोपीला तिचे म्हणणे आवडले नाही

लखनौ - अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने धाडस करून आपल्या आईची हत्या करणाऱ्या आरोपील पकडून दिल्याची घटना उत्तर प्रदेशमधील मिरत येथे घडली. या मुलाने चाकूने वार करून त्याच्या आईची हत्या करणाऱ्या आरोपीला खोलीत बंद केले. त्यानंतर पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला बेड्या ठोकल्या.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी येथे राहणाऱ्या या महिलेचे गेल्या १४ वर्षांपासून जावेद नावाच्या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. सदर महिलेचा पती दिल्लीमध्ये नोकरी करतो. तर ही महिला मिरत येथे ब्युटी पार्लर चालवत होती. दरम्यान, मंगळवारी सदर महिलेचा प्रियकर असलेला जावेद घरी आला. त्यानंतर त्यांच्या भांडण झाले.पोलिसांनी सांगितले की, सदर महिला आरोपीसोबत असलेले अनैतिक संबंध संपुष्टात आणू इच्छित होती. मात्र आरोपीला तिचे म्हणणे आवडले नाही. त्यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. मृत महिलेचा १२ वर्षांचा मुलगा खोलीबाहेरून हे सर्व पाहत होता. त्याचदरम्यान, आईच्या खोलीत असलेल्या त्या व्यक्तीने आईवर चाकूने सपासप वार केल्याचे त्याने पाहिले. हा प्रका पाहताच या मुलाने न घाबरता खोलीचा दरवाजा बंद केला आणि पोलिसांना फोन केला.मिरतचे एसपी (शहर) अखिलेश नारायण सिंह यांनी सांगितले की, सूचना मिळताच क्षणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेश