पणजी -अबकारी खात्याच्या अधिकाºयांनी पत्रादेवी येथे टेम्पोमधून लपवून नेली जाणारी तब्बल १२ लाख रुपये किमतीची दारु पहाटे ४.३0 च्या सुमारास जप्त केली. टेम्पो तेथेच सोडून चालकाने पळ काढला.एमएच- 0४-जेयू-२२४३ या टेम्पोमधून घराचे सामान असल्याचे भासवून चोरट्या पध्दतीने ही दारु महाराष्ट्रात नेली जात होती, असे अबकारी खात्याचे सहआयुक्त नवनाथ नाईक यांनी सांगितले. इचर टेम्पोमध्ये बेमालूमपणे मद्याच्या बाटल्यांचे खोके लपविण्यात आले होते. पत्रादेवी येथे गोवा अबकारी चेक नाक्यावर अधिकाºयांनी हा टेम्पो अडविला असता चालकाने घर बांधकामासाठी लागणारे साहित्य टेम्पोमध्ये असल्याची खोटी कागदपत्रे दाखवली. परंतु अधिकाºयांचा संशय बळावल्याने त्यांनी टेम्पोची पूर्णपणे झडती घेतली असता दारुच्या बाटल्या आढळून आल्या. मॅकडोवेल नंबर वन, रॉयल चॅलेंज व्हिस्की आदी देशी बनावटीच्या विदेशी दारुच्या बाटल्यांचे ३३५ खोके तसेच बीयरचे ५२ खोके याचा यात समावेश आहे. तपासणी चालू असताना अंधाराचा फायदा घेत चालकाने पळ काढल्याचे नाईक यांनी सांगितले.अबकारी उपनिरीक्षक मोहनदास गोवेकर यांच्या नेतृत्त्वाखाली अबकारी रक्षक शांबा परब, साहाय्यक रक्षक सिध्देश हळर्णकर, रेमंड परैरा, स्वप्नेश नाईक, सुरज गावडे यांनी ही कारवाई केली.चालकाने अंधाराचा फायदा घेत पलायन केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
गोव्यातून महाराष्ट्रात नेली जाणारी १२ लाखांची दारु पत्रादेवी येथे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 14:41 IST