शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
6
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
7
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
8
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
9
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
10
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
11
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
12
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
13
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
14
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
15
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
16
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
17
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
18
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
19
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
20
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला

बीएचआर अपहार प्रकरणामध्ये 12 जणांना अटक; 7 ठिकाणी छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 08:05 IST

पुणे पोलिसांच्या १५ पथकांची कारवाई; पाच दिवसांची पाेलीस काेठडी 

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी पुन्हा जळगाव शहर, जामनेर, पाळधी, भुसावळ, औरंगाबाद, मुंबई, अकोला व पुणे येथे एकाच वेळी १५ पथकांनी धाड टाकली. या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे न्यायालयाने पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांचे पथक जळगावात दाखल झाले. जळगाव जिल्ह्यात १०, तर इतर ठिकाणी बाहेर ५ अशा पथकांनी एकाच वेळी धाड टाकत अनेकांना अटक केली. भागवत भंगाळे यांना मॉर्निंग वॉक करतानाच सहा वाजता ताब्यात घेतले, तर प्रेम कोगटा यांना पुण्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले.

काय आहे प्रकरण?पुणे येथील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२० रोजी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह दहा जणांवर फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. २६ नोव्हेंबर रोजी १३५ जणांचे पथक जळगावात दाखल झाले होते. आता पुन्हा पुणे पोलिसांची ५० जणांची १० पथके दुसऱ्यांदा जळगावात आली. दिवसभर अटक, पंचनामा व इतर प्रक्रिया करून सायंकाळी पुण्याकडे रवाना झाली.

ठेवीदारांच्या पावत्यांमध्ये समायोजित केली कर्जअटक केलेल्या सर्व जणांनी बीएचआर पतसंस्थेतून मोठमोठी कर्ज घेतली आहेत. कर्जाची परतफेड करताना ठेवीदारांच्या पावत्यांमध्ये नियमबाह्य कर्जाची रक्कम समायोजित केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

 सहकार क्षेत्रात खळबळमानकापे यांनी सहकाराच्या माध्यमातून मोठे साम्राज्य उभे केले आहे. विविध संस्थांचे ते संस्थापक आहेत. आदर्श महिला नागरी सहकारी बँक, आदर्श पतसंस्था शिवाय आदर्श दूध डेअरी, आदर्श इंग्लिश स्कूल, आदर्श रुग्णालय तसेच एका वर्तमानपत्राचे ते संस्थापक आहेत. त्यांच्या अटकेने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली.

अटक केलेले सर्व संशयित बलाढ्य कर्जदार आहेत. त्यांनी ठेवीदारांच्या पावत्या घेऊन त्यात स्वत:चे कर्ज नियमबाह्य समायोजित केली आहेत. त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत.    - भाग्यश्री नवटके, उपायुक्त,     आर्थिक गुन्हे शाखा, पुणे

अटक करण्यात आलेल्यांची नावेछगन झाल्टे (जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक), भागवत गणपत भंगाळे (सराफ तथा हॉटेल व्यावसायिक), प्रेम रामनारायण कोगटा (दालमिल असोसिएशन), राजेश लोढा (कापूस व्यापारी), आसीफ मुन्ना तेली (माजी उपनगराध्यक्षांचा मुलगा), जयश्री शैलेश मणियार, संजय भगवानदास तोतला, जितेंद्र रमेश पाटील, प्रीतेश चंपालाल जैन, अंबादास आबाजी मानकापे, जयश्री अंतिम तोतला, प्रमोद किसनराव कापसे

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिस