शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नागपूर विभाग लोहमार्ग पोलिसांनी ११४१ चोरांना पाठविले जेलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 20:08 IST

लोहमार्ग नागपूर पोलिसांच्या अधिपत्याखाली गोंदिया, इतवारी, नागपूर, वर्धा, बडनेरा आणि अकोला अशी सहा पोलीस ठाणी आहेत. या सहा पोलीस ठाण्यांतर्गत १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत ११४१ चोरांना जेलमध्ये पाठविले, तर १२९७ जणांना चोरी करताना पकडले आहे.

ठळक मुद्देसहा पोलीस ठाणे : तीन वर्षांत रेल्वे रुळ ओलांडताना १७० जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोहमार्ग नागपूर पोलिसांच्या अधिपत्याखाली गोंदिया, इतवारी, नागपूर, वर्धा, बडनेरा आणि अकोला अशी सहा पोलीस ठाणी आहेत. या सहा पोलीस ठाण्यांतर्गत १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत ११४१ चोरांना जेलमध्ये पाठविले, तर १२९७ जणांना चोरी करताना पकडले आहे. तर याच काळात ११०१ कोर्ट केसेस प्रलंबित असल्याची माहिती लोहमार्ग नागपूर पोलिसांनी माहितीच्या अधिकारात दिली आहे.अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात लोहमार्ग नागपूर पोलिसांना त्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत माहिती मागविली. त्याअंतर्गत जनमाहिती अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) वासुदेव डाबरे यांनी माहिती दिली. नागपूर कार्यक्षेत्रांतर्गत गोंदियाची हद्द २३९ किमी, इतवारी ३६३ किमी, नागपूर १२६, वर्धा ३६३, बडनेरा २३३ किमी, अकोला ३१६ किमी अशी एकूण १६४० किमीची हद्द आहे. तसेच रेल्वे अपघातात तीन वर्षांत ५३३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याअंतर्गत गोंदिया हद्दीत ८७, इतवारीत हद्दीत १००, नागपूर १२२, वर्धा १४१ आणि अकोला हद्दीत ७३ तर गोंदिया हद्दीत दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तसेच रेल्वे क्रॉसिंगवर बडनेरा येथे तीन वर्षांत पाच जणांचा मृत्यू झाला.तीन वर्षांत लोहमार्ग पोलीस, नागपूरकडे एकूण ८०८६ चोऱ्यांची नोंद झाली असून गोंदिया हद्दीत ५६७ चोऱ्या, इतवारी ३४२, नागपूर २७७०, वर्धा ९०७, बडनेरा १४१३ आणि अकोला हद्दीत २०८७ चोऱ्या झाल्या आहेत. त्याअंतर्गत १४.९० कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. त्यानुसार गोंदिया हद्दीत १.२० कोटी, इतवारी ६६.८९ लाख, नागपूर ३.९० कोटी, वर्धा २.५१ कोटी, बडनेरा २.८७ कोटी, अकोला हद्दीत ३.७४ कोटी रुपयांची चोरी झाली. याशिवाय केवळ वर्धा येथे प्रवाशांच्या पाच वस्तू जप्त करण्यात आल्या. त्यांची एकूण किंमत ३९ हजार रुपये आहे. तसेच याच काळात १.९० कोटी रुपये किमतीच्या वस्तू पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामध्ये गोंदियात ३.६६ लाख, इतवारीत २.६२ लाख, नागपूर २४.७३ लाख, १४.४८ लाख, बडनेरा १.४० कोटी, अकोला येथे ४.५० लाख आदींचा समावेश आहे.तीन वर्षांच्या कालावधीत प्रलंबित ११०१ केसेसमध्ये गोंदियात ८७, इतवारीत ३९०, नागपूर १९३, वर्धा ११९, बडनेरा १६७ आणि अकोला येथे १४५ कोर्ट केसेस प्रलंबित आहेत. पोलिसांनी चोरीदरम्यान १२९७ चोरांना पकडले. यामध्ये गोंदियात १९५, इतवारी ८१, नागपूर ३०१, वर्धा २५८, बडनेरा १५३ आणि अकोला येथे २०३ चोरांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यापैकी गोंदिया येथे ३००, इतवारी ७३, नागपूर ३०१, वर्धा २५८, बडनेरा १५८, अकोला येथे ५१ अशा एकूण ११४१ चोरांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली.तीन वर्षांच्या कालावधीत प्रलंबित ११०१ केसेसमध्ये गोंदियात ८७, इतवारीत ३९०, नागपूर १९३, वर्धा ११९, बडनेरा १६७ आणि अकोला येथे १४५ कोर्ट केसेस प्रलंबित आहेत. पोलिसांनी चोरीदरम्यान १२९७ चोरांना पकडले. यामध्ये गोंदियात १९५, इतवारी ८१, नागपूर ३०१, वर्धा २५८, बडनेरा १५३ आणि अकोला येथे २०३ चोरांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यापैकी गोंदिया येथे ३००, इतवारी ७३, नागपूर ३०१, वर्धा २५८, बडनेरा १५८, अकोला येथे ५१ अशा एकूण ११४१ चोरांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

 

टॅग्स :railwayरेल्वेtheftचोरीArrestअटकRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता