शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

११० खाती, ३० कोटींचे व्यवहार, १२ जणांना अटक; मुंबई पोलिसांकडून सायबर टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 06:48 IST

देशभरात ५०९ फसवणुकीच्या तक्रारी, ही रक्कम क्रिप्टोमध्ये रुपांतरीत करत कंबोडियाला पाठविण्यात आली. 

मुंबई - गावदेवी पोलिसांनी कंबोडिया देशातून सुरू असलेल्या सायबर टोळीचा पर्दाफाश करत १२ जणांना अटक केली. या टोळीने बँकांमध्ये ११० बँक खाती उघडून त्याद्वारे ३० कोटींचे व्यवहार केल्याची माहिती समोर आली. या बँक खात्याविरुद्ध देशभरात ५०९ तक्रारी नोंद झाल्या आहेत. 

गावदेवीतील ७४ वर्षीय वृद्धाला या टोळीने गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचा बहाणा करून एक लाख रुपयांना गंडवले. याप्रकरणी गुन्हा नोंदवत केलेल्या तपासात, फसवणुकीची रक्कम आरोपींनी मोहोळ येथील आरोपी केशव कुलकर्णीच्या बँक खात्यावर जमा केली. पुढे ती पंजाब येथे पाठवत रोख स्वरूपात काढली. ही रक्कम क्रिप्टोमध्ये रुपांतरीत करत कंबोडियाला पाठविण्यात आली. 

पोलिस उपायुक्त मोहित कुमार गर्ग यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. पथकाने मोहोळ, सोलापूर (९), खारघर (१), गोवा (१)  व पंजाब (१) असे १२ आरोपी अटक केले. राजेंद्र सिंग ऊर्फ कुन हॅश, रोमन रेगीन्स ऊर्फ प्रवीण लोंढे, संदीप काकडे, आदित्य कुलकर्णी, अतुल कोळी, फजलेरसुल अहमद, पीयूष अग्रवाल, नामदेव काळे, शिवाजी साळुंके, गुरुविंदर सिंग, सागर ऊर्फ केशव कुलकर्णी, दर्शन म्हात्रे अशी अटक आरोपींची नावे आहेत.

...म्हणून ‘लोकेशन’ कोडवर्ड कंबोडिया येथील फसवणूक करणाऱ्या एच.वाय. पे आणि एच.एन. नावाच्या कंपनीसाठी हे आरोपी काम करत होते, तर मोहोळ, गोवा, पुणे, जयपूर अशा विविध ठिकाणी आरोपींनी बँक खातेदारांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. आरोपींनी त्याला ‘लोकेशन’ असे नाव दिले होते. लोकेशनचे काम हे हॅन्डलर याला दिले होते. 

असे चालायचे काम... अटक आरोपी हे खातेदारांकडून बँक खाती उघडून घ्यायचे. पुढे सर्व बँक खाते स्वत: कंबोडिया येथे कार्यरत असणाऱ्या चिनी वंशाचा लोकांना देत होते. भारतात विविध ठिकाणी बँक खातेदारांना बोलावून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करून बँक खात्यांचे किट आणि बँक खात्याला लिंक मोबाइल सिम कार्ड घेत. हे सिम कार्ड अन्य मोबाइलमध्ये टाकून आरोपींनी दिलेले ॲप इन्स्टॉल करत. त्यावर येणारे ओटीपी कंबोडिया देशातील आरोपींना पाठवून सायबर फसवणुकीतील रक्कम विविध बँक खात्यात ट्रान्स्फर करत होते. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम