शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा शहरात ११ तलवारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 11:03 IST

11 swords seized in Nandura : दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ११ धारदार तलवारी व ५ फायटर जप्त करून दोन आरोपींविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क   नांदुरा :  गस्तीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व नांदुरा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने  शहरात १८ जुलै रोजी दुपारी २ ते ५ वाजेदरम्यान दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ११ धारदार तलवारी व ५ फायटर जप्त करून दोन आरोपींविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. स्थानिक गुन्हे शाखा बुलडाण्याचे पथक नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालीत होते. यावेळी मोतीपुरा येथील सागर श्रीकृष्ण देवकर (वय २४) हा युवक साई पार्ककडे जाणाऱ्या रोडवर हातात धारदार तलवार घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली. त्यास घटनास्थळावर जाऊन तलवारीसह ताब्यात घेण्यात आले, तर दुसऱ्या घटनेत वार्ड क्रमांक २ मधील नीलेश सुरेश डवले (वय ३५) याच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरातून १० धारदार तलवारी व ५ फायटर असा एकूण १०५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हाधिकारी  यांचा शस्त्रबंदीचा आदेश अमलात असतानादेखील ही शस्त्रे विक्री व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीररीत्या बाळगताना आढळला. याप्रकरणी  एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार यांनी फिर्याद दिली. 

टॅग्स :NanduraनांदूराCrime Newsगुन्हेगारी