शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पप्पा, लवकर या,..; शेतातून घरी परतताच मुलगी मात्र जिवंतच नव्हती, बाप हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 13:55 IST

सातत्याने तिला आईची आठवण येत होती. आईच्या निधनानंतर सारिकाच्या वागण्यात बदल झाला.

पीलीभीत - शहरातील बिलसंडा परिसरात दहावीत शिकणाऱ्या मुलीचा मंगळवारी खोलीत ओढणीला फास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. वडील शेतावरून घरी पोहचले तेव्हा ही घटना उघडकीस आली. या घटनेनं कुटुंबाला मोठा धक्का बसला असून नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. 

१६ वर्षाच्या सारिकाचं आईवरचं प्रेम तिच्या घरच्यांना कळालेच नाही. सारिका आईला विसरेल असं घरच्यांना वाटत होते परंतु आईच्या मृत्यूने सारिकाला जबर धक्का बसला होता. सातत्याने तिला आईची आठवण येत होती. आईच्या निधनानंतर सारिकाच्या वागण्यात बदल झाला. ती हळूहळू शांत राहू लागली. कुणाशीची बोलत नसायची. सारिकाच्या आईचा २०१५ मध्ये स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला. 

आईच्या मृत्यूवेळी सारिका फक्त ९ वर्षांची होती. अचानक आई सोडून गेल्यानं सारिकाच्या आयुष्यावर परिणाम झाला. सारिका स्वभावाने शांत होती. आईच्या मृत्यूनंतर ती समजूतदार झाली होती. या घटनेनंतर सारिका छोटा भाऊ आयुषसह स्वत:ला सांभाळण्यास लागली होती. परंतु एकाएकी सारिकाच्या शांत स्वभावामुळे नातेवाईकांना काही कळाले नाही. ५ दिवसांपासून सारिका आई रोमीचा फोटो सातत्याने पाहत होती. 

कुटुंबाने म्हटलं की, सारिका हातात आईचा फोटो घेऊन तिच्या आठवणीत हरवून जायची. सोमवारी सारिका घरी एकटी असताना तिला स्वत:ला सांभाळता आले नाही. एकटेपणामुळे तिने खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. आईचा विरह सहन न झाल्याने सारिकाने आत्महत्या केली असं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. 

पप्पा, लवकर या.... मुलगी सारिकाच्या निधनानं वडिलांचे डोळे पाणावले होते. ७ वर्षापूर्वी पत्नी आणि आता एकलुती एक मुलगी सारिकाच्या जाण्याने त्यांना धक्का बसला होता. सारिका खूप समजूतदार होती. आईच्या मृत्यूनंतर तिने घरची जबाबदारी चांगल्यारितीने सांभाळली. सोमवारी रात्री शेतात जाताना तिने पप्पा, लवकर या, आज मसूरची डाळ बनवली आहे असं म्हटलं. पण जेव्हा मी परतलो तेव्हा सारिका हे जग सोडून गेली होती. मृत्यूपूर्वी सारिकाने माझ्यासाठी जेवण तयार करून ठेवले होते असं वडिलांनी म्हटलं.