शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कबरीतून 10 वर्षीय मुलीचे शीर गायब; तामिळनाडूतील धक्कादायक घटना, पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 20:03 IST

तामिळनाडूतील चेंगलपट्टू जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Tamilnadu News: तामिळनाडूतील चेंगलपट्टू जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मधुरंठकमजवळील चित्रवाडी गावात 10 दिवसांपूर्वी पुरलेल्या 10 वर्षीय मुलीचे शीर बेपत्ता झाले आहे. सहावीत शिकणारी 10 वर्षीय कृतिका 5 ऑक्टोबर रोजी घराबाहेर खेळत होती. यादरम्यान विजेचा खांब पडल्याने ती गंभीर जखमी झाली. नऊ दिवस हॉस्पिटलमध्ये आयुष्याशी झुंज दिल्यानंतर 14 ऑक्टोबरला कृतिकाचा मृत्यू झाला.

15 ऑक्‍टोबर रोजी कृतिकावर अंत्यसंस्कार करण्यात आला. सुमारे दहा दिवसांनंतर, तिच्या पालकांना(पांडियन आणि नादिया) मुलीच्या कबरीशी छेडछाड झाल्याचे लक्षात आले. संशयाच्या आधारे मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जिल्हा वैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि जिल्हा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कबर खोदली. 

यावेळी मुलीचे डोके कबरीतून गायब झाल्याचे पाहून तेथे उपस्थित सर्व लोक चक्रावून गेले. चित्तूर पोलीस आता वेगवेगळ्या अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. पूर्ववैमनस्यातून मुलीचे शीर कोणीतरी सोबत नेले आहे का किंवा जादूटोण्यामुळे हे काम केले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, खरे कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना घटनास्थळावरून काही वापरलेले हातमोजे आणि टॉर्च सापडली आहे. या वस्तूंच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. 

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारी