शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

७० लाखांची खंडणी मागणाऱ्या १० तोतया नक्षलवाद्यांना अटक; पुल बांधकामावरील दिवानजीचे केले अपहरण

By दिगांबर जवादे | Updated: November 27, 2022 16:15 IST

याबाबतची तक्रार दिवानजी आत्राम यांनी १२ नोव्हेंबर रोजी उप पोलीस स्टेशन पेरमीली येथे दाखल केली.

गडचिरोली: अहेरी तालुक्यातील उप पोलीस स्टेशन पेरमीली हदीतील चंद्रा जवळील बांडिया नदीवर पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या दिवानजीकडे ७० लाख रूपयांची मागणी करून त्याचे अपहरण करणाऱ्या १० ताेतया नक्षलवाद्यांना पेरमिली पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दाेन भरमार बंदुका, दुचाकी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

चैनु कोम्मा आत्राम वय ३९ वर्ष, दानु जोगा आत्राम वय २९ वर्ष दाेघेही रा. आलदंडी, शामराव लखमा वेलादी वय ४५ वर्ष, संजय शंकर वेलादी वय ३९ वर्ष, किशोर लालू सोयाम वय ३४ वर्ष तिघेही रा. चंद्रा, बाजू केये आत्राम वय २८ वर्ष रा. येरमनार टोला, मनिराम बंडू आत्राम वय ४५ वर्ष रा. रापल्ले, जोगा कोरके मडावी वय ५० वर्ष रा. येरमनारटोला, लालसू जोगी तलांडे वय ३० वर्ष रा. येरमनार, बजरंग बंडू मडावी वय ४० वर्ष रा. मल्लमपल्ली ता. अहेरी असे अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.

जी.एस.डी.इंडिस्टीज या कंपनीमार्फत बांडीया नदीवरील पुलाचे काम सुरु आहे. येथे काम करणारे दिवानजी राजेश आत्राम रा. लगाम यांना ११ ऑक्टाेबर राेजी एका अनोळखी इसमाने भारतीय कम्युनिष्ठ पार्टी, माओवादी दक्षिण गडचिरोली डिव्हिजन या लेटरहेडचे पत्र देऊन ७० लाख रूपयांची मागणी केली. ती मागणी मान्य न केल्याने ११ नाव्हेंबर राेजी रात्री ०३.१५ वाजता दोन अनोळखी बंदुकधारी व्यक्तींनी आत्राम यांचे कामाच्या ठिकाणावरून रापल्ले जंगल परीसरात अपहरण केले. बंदुकीचा धाक दाखवुन पुलाचे काम पुर्ण करायचे असेल तर ७० लाख रुपये तीन दिवसांत द्या नाही तर कंपनीच्या साहित्याची जाळपोळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. घटनास्थळी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केलेले १० ते १२ इसम आजुबाजुला उभे होते. ते नक्षलवाद्यांसारखे दिसत होते.

याबाबतची तक्रार दिवानजी आत्राम यांनी १२ नोव्हेंबर रोजी उप पोलीस स्टेशन पेरमीली येथे दाखल केली. त्यावरून आराेपींविराेधात भादंवि कलम ३६४ (अ), ३८७, ३४२, ५०६, ३४ भादंवी ३/२५ भारतीय हत्यार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता यात काही स्थानिक नागरिकांचा सहभाग असल्याचे दिसून आल्याने त्यांना अटक केली.ही कारवाई पोलीस अधिक्षक नीलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनात  पेरमिली उप पाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पाेलीस उपनिरिक्षक अजिंक्य जाधव, दिपक सोनुने, रामहरी जांबुळे, रविंद्र बोढे, राहुल खार्डे, महेश दुर्गे, प्रशांत मेश्राम, मधुकर आत्राम, विवेक सिडाम, राकेश उरवेते, ब्रिजेश सिडाम यांच्या पथकाने केले.हे साहित्य केले जप्त

ताेतया नक्षलवाद्यांकडून नक्षल पत्र, एमएच ३३ एल ८८४६, एमएच ३३ एन ३३२५ क्रमांकाच्या दाेन दुचाकी, दोन भरमार बंदुका, दाेन कमांडो हिरवी टि-शर्ट, लोअर पॅन्ट, टाॅर्च, एसएलआरची काळया रंगाची मॅग्झीन, १९ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली