शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

१ कोटी ८० हजार गोळा केले, 'या' चौघांनी केली होती रेकी; सरकारी वकिलांचा कोर्टात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:34 IST

Silver Oak Attack And Gunratna sadavarte : सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवात संपला असून त्यांनी ११ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. 

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी राहत्या घरातून गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी त्यांना मुंबईतील किला कोर्टात हजर करण्यात आले. सदावर्ते यांची बाजू जयश्री पाटील आणि इतर दोन वकिलांनी मांडली होती. हा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपत असून गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीला सुरुवात झाली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवात संपला असून त्यांनी ११ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. 

या युक्तिवादात घरत यांनी कोर्टात सांगितले की, एका मराठी न्यूज चॅनलचा चंद्रकांत सुर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने काही व्हिडिओ डिलीट केलेत. या पत्रकाराचे आणि सदावर्ते यांचे सकाळी १०.३० पासून व्हाॅटस अप चॅटिंग आहेत. या दोघांत  व्हाॅटस अप काॅल झाले. तर एक फोन नागपूर येथे करण्यात आला, त्याचे नाव आता आम्ही कोर्टात सांगू शकत नाही. सदावर्ते यांनी युनियनकडून पैसेही गोळा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 1 कोटी 55 लाखांहून अधिकची रक्कम गोळा केली आहे. काहीजण यामागे आहेत, जे वेस्टेड कारणाकरता सपोर्ट करतायेत. गेली ६ महिन्यांपासून पैसे कुठून येतायेत याचा तपास करायचा आहे. ५३० रुपये प्रत्येक एसटी कर्मचा-यांकडून गोळा केले गेले. जवळपास दीड कोटी रुपये रक्कम जमा आहे. घटनेच्या दिवशी सकाळी 11.35 वाजता नागपूरमधून  व्हाॅटस अप कॉल झाले होते. नागपूर कॉल नंतर 'पत्रकार पाठवा' चा मेसेज करण्यात आले. दुपारी 2.42 काही पत्रकारांनाही कॉल करण्यात आले. हा सुनियोजित कट होता. आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे. त्यामुळे वाढीव कोठडीची आवश्यकता आहे. मोहम्मद शेखने व्हॉट्स अप मेसेज केले आहेत. बॅनर पण तयार केले होते असून सावधान शरद ...सावधान शरद असे बॅनर तयार करण्यात आले. या बॅनरवर सदावर्ते पती पत्नीचा फोटो आहे. सदावर्ते यांचा विजयोत्सव बारामतीत साजरा करण्याची मिटींगसाठी एक बैठक झाली होती. जमा केलेल्या पैशांचे इतर ही काही लाभार्थी आहेत, हे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी ४ नवीन अटक केली आहे तर एकाच शोध सुरु आहे. आरोपी अभिषेक पाटील, कृष्णा कोरे, मोहम्मद ताजुद्दीन, सविता पवार या चौघांनी सिल्वर ओकची रेकी केली होती. आणखी मोबाईल फोन शोधायचा आहे आणि १ कोटी ८० लाख रुपये कोणी कसे गोळा केले, ते पैसे कोणी कोणी वापरले याचा तपास करायचा आहे. 

सिल्व्हर ओक हल्ल्याआधी झाली होती मीटिंग, नागपूरमधून आलेल्या कॉलबाबत चौकशी सुरू

गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात केले हजर, सातारा पोलीस ताबा मागणार

 

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिलPoliceपोलिसST Strikeएसटी संप