खासगी शाळांचा दे धक्का ठाणे महापालिका शाळंाची स्थिती- पाच वर्षांत ६ हजार विद्यार्थी घटले
By admin | Updated: September 20, 2015 00:53 IST
नामदेव पाषाणकर
खासगी शाळांचा दे धक्का ठाणे महापालिका शाळंाची स्थिती- पाच वर्षांत ६ हजार विद्यार्थी घटले
नामदेव पाषाणकर घोडबंदर : खासगी शाळांमुळे ठाणे महापालिका शाळांना मोठा धोका निर्माण झाला असून वर्षानुवर्षे पालिकेच्या शाळेचा पट घसरत चालला आहे. खासगी शाळांचे पेव फुटल्यामुळे पुरेसा विद्यार्थी पट मिळत नाही, अशी गंभीर स्थिती आहे. मागील पाच वर्षांत पालिकेच्या शाळेचा पट तब्बल सहा हजार ३१७ ने घसरला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पहिली ते पाचवीचे वर्ग एकत्रित भरवावे लागत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काही वर्षांत पालिकेच्या शाळांना टाळे लावण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते. महापालिकेच्या एकूण १२२ शाळा असून त्यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी असे प्राथमिक शाळेचे वर्ग भरले जायचे. मात्र, सध्या इयत्ता पहिली ते पाचवीला प्राथमिक आणि सहावी ते आठवीच्या वर्गांना उच्च प्राथमिकस्तराची मान्यता आहे. मागील वर्षापासून इयत्ता आठवीचा वर्ग प्राथमिकला जोडला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार १२२ शिक्षकांची कमतरता असल्यानेही मुलांना त्यांच्याविना धडे गिरवावे लागत आहेत. १५ जुलै २०१५ रोजी नोंदलेल्या आकडेवारीनुसार मराठी माध्यमाच्या शाळेत पहिली ते आठवीमध्ये १९ हजार ६१५, हिंदी माध्यमामध्ये तीन हजार ११६, उर्दू माध्यम ८ हजार ८५२, गुजराती माध्यमाला केवळ २८८ मुले शिकत आहेत. या वर्षी एकूण ३१ हजार ८७१ मुले शिकत आहेत. अशा गरीब पालकांची दिशाभूल करीत ५९ अनधिकृत शाळादेखील मुलांच्या शिक्षणासाठी पुढे आल्या आहेत. या शाळांतून जवळपास १५ हजारांहून अधिक मुले शिक्षण घेत आहेत. या अनधिकृत शाळांनी पालिकेच्या शाळेतील मुलांची पळवापळवी सुरू केली आहे. शाळा क्र मांक सातमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गात ३३, शाळा क्र मांक ९ मध्ये ३६, शाळा क्र मांक २ मध्ये ४१, शाळा क्र मांक ७२ मध्ये २७, तर ८३ मध्ये ४४ इतकी अल्प विद्यार्थी संख्या आहे. मागील पाच वर्षांतील घसरत चाललेला शाळेचा पट :२०११ - ३८,१८८२०१२ - ३६,३४३२०१३ - ३२,८७७२०१४ - ३३,०६०२०१५ - ३१,८७१....................................................