ऑनलाइन संचमान्यतेमुळे अडचण

By Admin | Published: August 1, 2016 11:58 PM2016-08-01T23:58:10+5:302016-08-01T23:58:10+5:30

पारदर्शकतेच्या उद्देशाने शासनाकडून ऑनलाइन संचमान्यतेचा स्वीकार झाला. या संचमान्यतेत वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी नियमित तसेच वैकल्पिक विषयांसाठी १२० तर माध्यमिक शाळांशी संलग्न उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी ८० विद्यार्थ्यांची तुकडी ग्रा‘ धरली जाते. पूर्वी जे प्रमाण ६०-४० होते; आज ते १२०-८० वर आले आहे. ज्या संस्था व महाविद्यालयांमध्ये यापूर्वी जास्तीच्या अनुदानीत तुकड्या मान्य आहेत. त्यांनी या तुकड्यांसाठी तेव्हाच्या गरजेनुसार शिक्षकांची पदे भरली आहेत. मात्र, आताच्या प्रमाणानुसार माध्यमिकप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालय स्तरावर शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे.

Problems with Online Recognition | ऑनलाइन संचमान्यतेमुळे अडचण

ऑनलाइन संचमान्यतेमुळे अडचण

googlenewsNext
रदर्शकतेच्या उद्देशाने शासनाकडून ऑनलाइन संचमान्यतेचा स्वीकार झाला. या संचमान्यतेत वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी नियमित तसेच वैकल्पिक विषयांसाठी १२० तर माध्यमिक शाळांशी संलग्न उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी ८० विद्यार्थ्यांची तुकडी ग्रा‘ धरली जाते. पूर्वी जे प्रमाण ६०-४० होते; आज ते १२०-८० वर आले आहे. ज्या संस्था व महाविद्यालयांमध्ये यापूर्वी जास्तीच्या अनुदानीत तुकड्या मान्य आहेत. त्यांनी या तुकड्यांसाठी तेव्हाच्या गरजेनुसार शिक्षकांची पदे भरली आहेत. मात्र, आताच्या प्रमाणानुसार माध्यमिकप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालय स्तरावर शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे.
शासनाकडून सवलतीची मागणी
मध्यंतरी वाणिज्य शाखेतही अशी स्थिती उद्भवली होती. तेव्हा शासनाने वाणिज्य शाखेच्या उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी त्या शैक्षणिक वर्षासाठी सवलत दिली होती. त्याच धर्तीवर आता शासनाने कला शाखेला ही सवलत द्यावी, यासाठी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेकडून लढा सुरू आहे. पूर्वी संचमान्यता मॅन्युअली होत असल्याने त्या-त्या शाखेत प्रवेशित विद्यार्थी संख्येत बदल करता येत होता. परंतु आता ऑनलाइन असल्याने सॉफ्टवेअरमध्ये ते बदल होत नाहीत. माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या संचमान्यतेसाठी विद्यार्थी तुकडी संख्या १२० वरून ८० करावी. तसेच वैकल्पिक विषयांसाठी विद्यार्थी तुकडी संख्या ही ६० करावी तसेच संचमान्यता ऑनलाइनऐवजी मॅन्युअली करावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे.

कोट............
कला शाखेला विद्यार्थी प्राधान्य देत नाहीत. ही स्थिती बदलत नाही तोवर शासनाने माध्यमिक शाळा व वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी विद्यार्थी तुकडी संख्या नियमित विषयांसाठी १२० वरून सरसकट ८० तर वैकल्पिक विषयांसाठी ६० केली पाहिजे. पुढे विद्यार्थ्यांचा कला शाखेला चांगला प्रतिसाद मिळाला तर त्यात पुन्हा बदल करता येऊ शकतो.
-प्रा.सुनील गरूड, ज्येेष्ठ मार्गदर्शक, जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना.

Web Title: Problems with Online Recognition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.