अकोला - पारसचे सरपंच संतोष दांदळे यांची १५ लाख रुपयांची रोकड चोरणार्या चोरट्यांचे रेखाचित्र पोलिसांनी रविवारी जाहीर केले. सहाय्यक पोलिस अधीक्षक यांचे पथक शनिवारी रात्रीपासून चोरट्यांचा शोध घेत असून, त्यांना अद्यापपर्यंत कुठलाही सुगावा लागला नसल्याची माहिती आहे.पारसचे सरपंच संतोष श्रीराम दांदळे यांची १५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग एमएच ३0 एएफ ४८४0 क्रमांकाच्या इनोव्हा कारमधून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून लंपास केली होती. शनिवारी रात्री जिल्हय़ात नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेतला मात्र कुठलाही सुगावा त्यांना अद्याप लागलेला नाही. एका हॉटेलमधील सीसी कॅमेर्यामध्ये हे चोरटे कैद झाले असून पोलिसांनी त्या आधारावर या दोन्ही चोरट्यांचे रेखाचित्र जाहीर केले आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत डॉ. मुंढे यांच्या पथकाद्वारे चोरटयांचा शोध घेण्यात येत होता.
१५ लाखांच्या चोरी प्रकरणाचा तपास शून्य
By admin | Updated: September 15, 2014 02:02 IST