आयटी फेस्टाचा समारोप आयएमआर : विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान
By admin | Updated: January 26, 2016 00:04 IST
जळगाव : केसीई सोसायटीच्या आयएमआर महाविद्यालयात आयोजित आयटी फेस्टा २०१५ या स्पर्धेचा सोमवारी समारोप झाला. स्पर्धेत यश मिळविणार्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आयटी फेस्टाचा समारोप आयएमआर : विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान
जळगाव : केसीई सोसायटीच्या आयएमआर महाविद्यालयात आयोजित आयटी फेस्टा २०१५ या स्पर्धेचा सोमवारी समारोप झाला. स्पर्धेत यश मिळविणार्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वनिरा हायटेकचे संस्थापकीय अध्यक्ष वासुदेव महाजन होते. कार्यक्रमाला संचालक डॉ. विवेक काटदरे उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रा. नीता पाटील, प्रा. शुभांगी किनगे, प्रा. धीरज अमृतकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. चारूता खडके यांनी केले. आभार प्रा. रंजना झिंझोरे यांनी मानले. स्पर्धा निहाय यशस्वी स्पर्धकांची नावे अशी : सॉफ्टवेअर स्पर्धा : पदव्युत्तर व व्यावसायिक गट- प्रथम विनय काटदरे आणि संयोग मुळे (एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव), द्वितीय- निखिल राणे व राहुल पाटील (एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय), तृतीय- कांचन पाटील व शिवानी देशमुख (आयएमआर महाविद्यालय), पदवी गट : प्रथम- श्रीपाद कुळकर्णी आणि चेतन कुळकर्णी (मू. जे. महाविद्यालय), द्वितीय- सविता चौधरी व आरती येवले (कोटेचा महाविद्यालय, भुसावळ), तृतीय- हर्षवर्धन पटेल (व्ही. एस. नाईक कॉलेज, रावेर), प्रश्नमंजुषा : प्रथम- स्वप्नील बाविस्कर व स्वप्नील पाटील (जी.जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर), द्वितीय- उदय मोदी आणि शुभम काळे (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय) व तृतीय- रोहन चौधरी आणि आशुतोष पाटील (आयएमआर महाविद्यालय), पेपर प्रेझेण्टेशन : प्रथम : शीतल चौधरी (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव), मैत्रेयी ओझा, निवेदिता शिंदे (आयएमआर), द्वितीय- मृणाली बावस्कर, मनीषा मस्रा (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय), तृतीय- लीना खडके, मयूरी झोपे (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय) (फोटो आहेत)