शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

कधी थांबणार ग्रंथांची महोत्सवी उपेक्षा?

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

औरंगाबाद : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे घेण्यात येणारा जिल्हा ग्रंथ महोत्सव दरसालप्रमाणे यथासांग पार पडला. विविध सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिकांच्या मुलाखती यांची रेलचेल, विद्यार्थ्यांसाठी अनेकविध स्पर्धा साजर्‍या झाल्या.

औरंगाबाद : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे घेण्यात येणारा जिल्हा ग्रंथ महोत्सव दरसालप्रमाणे यथासांग पार पडला. विविध सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिकांच्या मुलाखती यांची रेलचेल, विद्यार्थ्यांसाठी अनेकविध स्पर्धा साजर्‍या झाल्या.
मात्र महोत्सवाचा मूळ उद्देश होता ग्रंथांची ओळख आणि विक्री. हा हेतू मात्र, कुठेतरी हरवल्याचे चित्र होते. तीन दिवसांत शहरभरातील पालक व विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेटी देणे अपेक्षित होते. मात्र, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या शाळकरी मुलांव्यतिरिक्त कोणीही आवर्जून इकडे फिरकले नाही. या महोत्सवाची पुरेशी प्रसिद्धी करण्याची तसदीच शासनाकडून घेतली गेली नसल्याची भावना एका स्टॉलधारकाने बोलून दाखविली. सर्व साधन-सुविधा असताना अनेकदा केवळ संवेदनशीलता व कल्पकतेचा अभाव ही आपल्या शासकीय कार्यपद्धतीची ओळख आहे. लालफितीतला कारभार या नावाने प्रसिद्ध असणारा हा एकूण व्यवहार वाचन संस्कृतीच्या प्रवाहीपणाला फारसा पुढे नेऊ शकला नाही. वाचक पुस्तकांपर्यंत पोहोचला नाही; तर पुस्तकेच वाचकोंपर्यंत पोहोचतील याचे प्रयत्न व्हावे लागतात. आधुनिक तंत्रयुगातील माध्यमांचा प्रभावी वापर करत अधिक संवादी बनणे सहज शक्य आहे. या महोत्सवाचे स्वरूप केवळ उत्सवी होत असल्याचेच ठळकपणे जाणवते आहे. दीर्घकाळ मनात रुजणारे वाचनवेड या महोत्सवातून कोवळ्या वयाला मिळायला हवे. मात्र, तीन दिवसांचा आनंदोत्सव, स्पर्धा, बक्षिसे यांच्यापलीकडे जाण्यात महोत्सव अपयशी ठरला. भाषणे, व्याख्याने यातून प्रसंग साजरा केल्याचे तात्पुरते समाधान मिळते. मात्र, उद्याचा वाचक घडवायचा, टिकवायचा असेल तर काही अधिक विचारीपणे व्हायला हवे. निमंत्रित साहित्यिक सोडले तर शहरातील एकही ज्येष्ठ वा नव्या दमाचा साहित्यिक-कवी महोत्सवात फिरकला नाही. नव्या पिढीशी जोडून घेत त्यांच्या हाती अक्षरठेवा सोपविण्याची ही संधी त्यांना का मोलाची वाटली नाही?
शेवटी काय तर, ऐकलेले शब्द वार्‍यावर विरून जातील कालांतराने. मात्र, कुणीतरी वाचावे म्हणून कुणी लिहिलेली अक्षरे दीर्घकाळ सोबत करतात. त्या अक्षरांना एकाकीपणापासून वाचवायला हवे, त्यासाठी वाचायला हवे, नाही का?