अभियांत्रिकी प्रवेशाची संधी कायम प्रवेशप्रक्रिया : ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरता येणार

By admin | Published: August 3, 2016 10:15 PM2016-08-03T22:15:31+5:302016-08-03T22:28:30+5:30

नाशिक : प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्र माच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आले असून विद्यार्थ्यांनी सोमवारपासून (दि. १) संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यास सुरु वात केली आहे. मात्र, ज्यांनी ऑनलाइन प्रक्रि येत अद्याप सहभागच घेतला नाही, अशाही विद्यार्थ्यांना पाचव्या फेरीतून प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे काही कारणास्तव अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची संधी अजूनही कायम आहे.

Entry for Engineering Entry: Entrance Process: Online Form can be filled by August 5 | अभियांत्रिकी प्रवेशाची संधी कायम प्रवेशप्रक्रिया : ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरता येणार

अभियांत्रिकी प्रवेशाची संधी कायम प्रवेशप्रक्रिया : ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरता येणार

Next

नाशिक : प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्र माच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आले असून विद्यार्थ्यांनी सोमवारपासून (दि. १) संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यास सुरु वात केली आहे. मात्र, ज्यांनी ऑनलाइन प्रक्रि येत अद्याप सहभागच घेतला नाही, अशाही विद्यार्थ्यांना पाचव्या फेरीतून प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे काही कारणास्तव अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची संधी अजूनही कायम आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई) अभियांत्रिकी अभ्यासक्र माची प्रवेशप्रक्रि या राबविली जाते. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी चार फेर्‍या उपलब्ध करून देण्यात आल्या. यातही पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या प्रवेश फेरीत प्रवेश मिळूनही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे पसंतीक्र म बदलण्याची संधी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना जवळच्या अंतरावरील आणि आवडीच्या महाविद्यालयाची निवड करता आली. काही विद्यार्थ्यांनी सोमवारपासून प्रवेश घेण्यास सुरु वात केली आहे. मात्र, वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी पाचवी फेरी घेतली जात आहे. या विद्यार्थ्यांची स्वतंत्र प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. मात्र, पाचव्या फेरीतून महाविद्यालय स्तरावरील कोट्यातील जागांवर आणि शासकीय महाविद्यालयातील रिक्त जागांवरच प्रवेश दिले जाणार आहेत. (प्रतिनिधी)

वेळेत आवश्यक कागदपत्र प्राप्त न झाल्याने पूर्ण अर्ज भरता आला नाही. तसेच प्रवेशप्रक्रि या सुरू असताना जे विद्यार्थी प्रवेशास पात्र नव्हते, मात्र आता पात्र झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. याच कालावधीत ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटरवर (एआरसी) कागदपत्रांची तपासणी करून अर्जही सबमिट करता येईल.

Web Title: Entry for Engineering Entry: Entrance Process: Online Form can be filled by August 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.