व्यापारी संकुलाबाबत उद्या निर्णय होणार
By admin | Updated: January 26, 2016 00:04 IST
जळगाव : शासन निर्णयानुसार मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी २७ जानेवारीला सकाळी ११ वाजता महासभा आयोजित करण्यात आली आहे.
व्यापारी संकुलाबाबत उद्या निर्णय होणार
जळगाव : शासन निर्णयानुसार मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी २७ जानेवारीला सकाळी ११ वाजता महासभा आयोजित करण्यात आली आहे. गेल्या महासभेच्या अजेंड्यावरदेखील हा विषय होता. परंतु, या सभेला मनपा आयुक्त संजय कापडणीस उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या उपस्थितीत या विषयावर निर्णय घ्यावा, अशी मागणी सदस्यांनी केली होती. त्यानुसार गेल्या सभेत हा विषय तहकूब ठेवण्यात आला होता. त्यानुसार या विषयी बुधवारी होणार्या महासभेत चर्चा केली जाणार आहे.