रचना कला महाविद्यालयातर्फे स्पर्धा
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
अहमदनगर : रचना कला महाविद्यालयातर्फे राज्यस्तर निसर्ग चित्रण व तालुकास्तर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रचना कला महाविद्यालयातर्फे स्पर्धा
अहमदनगर : रचना कला महाविद्यालयातर्फे राज्यस्तर निसर्ग चित्रण व तालुकास्तर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकला स्पर्धा शहर व तालुकास्तरावर १ ली ती १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध ७ गटात होणार आहे. मूकबधिर, मतिमंद, अपंग गटासाठीही स्पर्धा होईल. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत कोर्ट गल्लीतील दादा चौधरी विद्यालयात चित्रकला स्पर्धा होईल. ५ सप्टेंबर रोजी खुली राज्यस्तर प्रत्यक्ष निसर्ग चित्रण स्पर्धा होईल. यात राज्यातील २१० चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होतील. जिल्ह्यात प्रथमच होणार्या स्पर्धेत विजेत्यांना हजारो रुपयांची बक्षिसे आहेत. महाविद्यालयाने यावर्षापासून दिवंगत चित्रकार अर्जुनराव शेकटकर व चित्रकार दत्तात्रय कांबळे यांच्या नावाने राज्य स्मृती पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. ज्येष्ठ शिल्पकार अंबादास मुदीगंटी व कलाध्यापक नंदकुमार यन्नम यंदाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत. दरम्यान, पुरस्कार व बक्षीस वितरण समारंभ ५ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती महाविद्यालयाने दिली आहे.